Priyanka Chaturvedi | “या आमदार, खासदारांनी राज्यातील मतदारांशी विश्वासघात केला”; ठाकरे गटाच्या खासदाराचा शिंदे गटावर आरोप

Priyanka Chaturvedi | मुंबई : शिवसेनेमधील एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सेनेतून बाहेर पडून 40 आमदारांच्या सोबतीने स्वतंत्र गट निर्माण केला. त्यानंतर ‘शिवसेना’ पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह यावरून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष टोकाला पोहचून केंद्रीय निवडणूक आयोगापुढे कागदोपत्री आणि लेखी युक्तिवाद सादर करण्यासाठी आज अखेरचा दिवस आहे. यावरून ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.

“शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल. पक्षाचे कार्यकर्ते असेल किंवा पदाधिकारी, निवडणूक आयोगाकडे सर्वाधिक प्रतिज्ञापत्र आम्ही सादर केले आहेत. तरीही शिंदे गट एका रात्रीत म्हणत असेल आम्ही शिवसेना आहे, तर ते पैसा आणि सत्तेच्या जोरावर बोलत आहेत. पण, जनता, पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आमच्या बरोबर आहेत आणि आम्ही ते निवडणूक आयोगासमोर सिद्धही केलं आहे. त्यामुळे संविधानानुसार निर्णय झाला तर हा निर्णय आमच्याच बाजूने लागेल”, अशी प्रतिक्रिया प्रियंका चतुर्वेदी यांनी दिली आहे.

“शिंदे गटाचे आमदार आणि खासदार शिवसेनेच्या चिन्हावर जिंकून आले आहेत. त्यानंतर हे लोकं जर एखादा गट निर्माण करत असेल, तर हा गट अमान्य आहे. मुळात त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आपल्या आमदाराकीचा राजीनामा देऊन स्वत:च्या हिंमतीवर लढून दाखवावं. हा एकप्रकारे राज्यातील मतदारांशी केलेला विश्वासघात आहे. आगामी निवडणुकीत जनताच यांना धडा शिकवेल”, असेही प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या आहेत.

“शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा निकाल आतापर्यंत यायला हवा होता. मात्र, हा निर्णय जाणीवपूर्वक पुढे ढकलण्यात येत आहे. कारण निवडणूक आयोगावर मोदी सरकारचा दबाव आहे. खरं तर निवडणूक आयोगच नाही, तर ईडी असेल किंवा सीबीआय असेल, आदी संस्थांवर मोदी सरकारचा दबाव आहे”, असा गंभीर आरोप प्रियंका चतुर्वेदी यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button