Ganga Aarti Destination | गंगा आरतीचा अनुभव घ्यायचा असेल, तर ‘या’ ठिकाणांना घ्या भेट

Ganga Aarti Destination | टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये गंगा नदीला खूप महत्त्व आहे. लोक या नदीची मनोभावे पूजा करतात. भारतातील गंगा आरती बघण्यासाठी अनेक विदेशी पर्यटक गंगा घाटला भेट देतात. भारतामध्ये अनेक ठिकाणी गंगा आरती केली जाते. या आरतीचा अनुभव घेण्यासाठी शेकडो भाविक या ठिकाणांना भेट देतात. तुम्हालापण गंगा आरतीचा अनुभव घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला गंगा आरतीच्या काही ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहे. गंगा आरतीचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही पुढील ठिकाणांना भेट देऊ शकतात.

ऋषिकेश

तुम्हाला जर प्रत्यक्षात गंगा आरतीचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही ऋषिकेशला भेट देऊ शकतात. या ठिकाणी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक गंगास्नान आणि गंगा आरतीसाठी येतात. ऋषिकेशला दररोज गंगा आरतीचे आयोजन केले जाते. त्यामुळे तुम्ही गंगा आरतीचा अनुभव घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही ऋषिकेशला नक्की भेट दिली पाहिजे.

काशी

काशी या धार्मिक शहरामध्ये दररोज गंगा आरती केली जाते. गंगा आरतीचा अनुभव घेण्यासाठी काशीला अनेक भाविक भेट देतात. या ठिकाणी तुम्हाला सर्वोत्तम गंगा आरतीचा अनुभव मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही गंगा आरती अनुभवाची योजना आखत असाल तर तुम्ही काशीचा या यादीत समावेश केला पाहिजे.

हरिद्वार

गंगा नदी तिच्या उगमापासून 253 किलोमीटर अंतर कापून हरिद्वारमध्ये प्रवेश करते. त्यामुळे हरिद्वारला गंगाद्वार असे देखील म्हणतात. गंगा नदीत पवित्र स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक हरिद्वारला भेट देतात. हरिद्वारला गंगा आरती मोठ्या थाटात केली जाते.

प्रयागराज

प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम आहे. म्हणून या ठिकाणाला प्रयागराज म्हणतात. प्रयागराजमध्ये गंगा आरतीचे आयोजन मोठ्या थाटात केले जाते. त्यामुळे तुम्हाला जर गंगा आरतीचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही प्रयागराजला भेट देण्याचा विचार करू शकतात.

महत्वाच्या बातम्या