Murali Vijay | टीम इंडियाचा माजी सलामीवीर मुरली विजयने घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Murali Vijay | टीम महाराष्ट्र देशा: टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज मुरली विजयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने ट्विटरवर पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली आहे. 38 वर्षीय मुरली विजय हा भारताचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात चांगला सलामवीर म्हणून ओळखला जात होता. त्याने टीम इंडियासाठी 61 कसोटी सामने खेळले आहे. या सामन्यांमध्ये त्याने 12 शतके ठोकली आहेत.

मुरली विजयने भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबर 2018 मध्ये खेळायला होता. त्याने आतापर्यंत 61 कसोटी, 17 एकदिवसीय आणि 9 टी,-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आज मुरली विजयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

मुरली विजयने 17 एकदिवसीय सामन्यांमध्ये 339 धावा केलेल्या आहेत. तर त्याने 61 कसोटी सामन्यांमध्ये 3982 धावा केल्या आहेत. 169 धावा त्याने 9 टी-20 मध्ये आपल्या नावावर केल्या आहे. तर कसोटी सामन्यांमध्ये त्याने 12 शतके लगावली आहेत.

मुरली विजयने 167 सर्वोच्च धावसंख्या केली होती. त्याने कसोटी सामन्यांमध्ये पंधरा अर्धशतके झळकावली आहेत. मुरली विजयला वनडे आणि टी-20 मध्ये यश मिळवता आले नाही. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये त्याचा चांगलाच बोलबाला होता.

महत्वाच्या बातम्या