NCP | राष्ट्रवादीला मोठा धक्का; शरद पवारांच्या निकटवर्तीय खासदाराचं सदस्यत्व रद्द

NCP | नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे लक्षद्वीप येथील खासदार मोहम्मद फैजल (MP Mohammad Faijal) यांचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. लोकसभेतील एक खासदार कमी झाला आहे. यामुळे त्यांची लोकसभेतील राष्ट्रवादीची ताकद अजून कमी झाली आहे. लोकसभा सचिवालयाने एका सदस्याचे सदसत्व रद्द केले आहे.

मोहम्मद फैजल यांना एका प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे फैजल याचे 11 जानेवारीपासून लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची माहिती लोकसभा सचिवालयाने दिली आहे. त्यानंतर मोहम्मद फैजल यांना अपात्र ठरवणारी अधिसूचना जारी केल्याची माहिती लोकसभा सचिवालयाकडून शुक्रवारी रात्री देण्यात आली आहे.

दरम्यान, 2009 च्या लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान काँग्रेसचे नेते पी.एम. सईद यांचे जावई आणि काँग्रेस नेते मोहम्मद सालेह यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या सालेह यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सालेह यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणात फैजल यांनी मदत केल्याचा आरोप केला गेला आहे.

या प्रकरणात लक्षद्वीपमधील कवरत्ती जिल्हा आणि सत्र न्यायालयाने मोहम्मद फैजल यांच्यासह अन्य तीन जणांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच, चारही जणांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. “माझ्यावर राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई केली जात आहे. या निर्णयाविरोधात केरळ उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.”, अशी प्रतिक्रिया मोहम्मद फैजल यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :