Share

MVA | अखेर ठरलं! नाशिक पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचा शुभांगी पाटलांना पाठिंबा

MVA | मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आता भाजपा आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची ठरत आहे. सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे काँग्रेसने त्यांना पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. ही निवडणूक अपक्षांची निवडणूक असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, असा प्रतिदावा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

या दाव्या-प्रतिदाव्यानंतर आज भाजपच्या नेत्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) या ‘मातोश्री’वर दाखल झाल्या आहेत. शुभांगी पाटील यांनी देखील नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरलेला आहे. त्यांना भाजपचा अधिकृत पाठिंबा मिळण्याची शक्यता होती. मात्र भाजप काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांच्याबाजूला झुकत असल्याचे दिसताच शुभांगी पाटील यांनी आपल्याला पाठिंबा मिळण्यासाठी ‘मातोश्री’ गाठून ठाकरे गटाचा पाठिंबा मिळतो का? याचा अंदाज घेण्यास सुरुवात केली.

नाशिक शिवसेनेचे पदाधिकारी, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे तसेच इतर नेत्यांमध्ये आज सकाळपासूनच बैठकांचं सत्र सुरु होतं. आज अखेर महाविकास आघाडी (MVA)तर्फे अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना पाठिंबा देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

दरम्यान, शुभांगी पाटील यांनी एक व्हिडिओ प्रसारीत करुन त्यांची भूमिका मांडली आहे. “महाविकास आघाडीने आपला अधिकृ उमेदवार निश्चित केला होता. त्यांना एबी फॉर्म देखील दिला. तसेच भाजपकडून दोन जणांना उमेदवारी मिळेल असे सांगण्यात येत होते. त्यातही शुभांगीताई तुम्हाला एबी फॉर्म देऊन असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मला सांगितले. मात्र दुपारी अडीच वाजता काँग्रेसच्या नेत्याने स्वतःचा अर्ज न भरता स्वतःच्या मुलाचा अपक्ष अर्ज भरला. एवढी नाट्यमय घडामोड कधीही नाशिक पदवीधर निवडणुकीत घडली नव्हती. विचित्र राजकारणाला आपण सामोरे जात आहोत. सामान्य घरातल्या मुलीने राजकारणात पुढे येऊच नये, असे काहींना वाटत आहे” असे शुभांगी पाटील म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :

MVA | मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आता भाजपा आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची ठरत आहे. सत्यजित तांबे यांनी अपक्ष …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now