Nashik Graduate Constituency Election | बंड पुकारत भाजपच्या उमेदवाराने पाठिंब्यासाठी ठोठावले ‘मोतोश्री’चे दार

Nashik Graduate Constituency Election | नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे. ही निवडणूक अपक्षांची निवडणूक असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, असा प्रतिदावा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला.

या दाव्या-प्रतिदाव्यानंतर आज भाजपच्या नेत्या शुभांगी पाटील या ‘मातोश्री’वर दाखल झाल्या आहेत. शुभांगी पाटील यांनी देखील नाशिक पदवीधर मतदारसंघातून( Nashik Graduate Constituency Election ) अपक्ष अर्ज भरलेला आहे. त्यांना भाजपचा अधिकृत पाठिंबा मिळण्याची शक्यता होती. मात्र भाजप काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांच्याबाजूला झुकत असल्याचे दिसताच शुभांगी पाटील यांनी आपल्याला पाठिंबा मिळण्यासाठी ‘मातोश्री’ गाठून ठाकरे गटाचा पाठिंबा मिळतो का? याचा अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे.

शुभांगी पाटील यांनी एक व्हिडिओ प्रसारीत करुन त्यांची भूमिका मांडली आहे. “महाविकास आघाडीने आपला अधिकृ उमेदवार निश्चित केला होता. त्यांना एबी फॉर्म देखील दिला. तसेच भाजपकडून दोन जणांना उमेदवारी मिळेल असे सांगण्यात येत होते. त्यातही शुभांगीताई तुम्हाला एबी फॉर्म देऊन असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मला सांगितले. मात्र दुपारी अडीच वाजता काँग्रेसच्या नेत्याने स्वतःचा अर्ज न भरता स्वतःच्या मुलाचा अपक्ष अर्ज भरला. एवढी नाट्यमय घडामोड कधीही नाशिक पदवीधर निवडणुकीत ( Nashik Graduate Constituency Election ) घडली नव्हती. विचित्र राजकारणाला आपण सामोरे जात आहोत. सामान्य घरातल्या मुलीने राजकारणात पुढे येऊच नये, असे काहींना वाटत आहे” असे शुभांगी पाटील म्हणाल्या आहेत.

“राजाचा मुलगा राजा नाही बनणार. ज्याच्यामध्ये कसब आहे, तोच राजा बनणार. संपूर्ण महाराष्ट्राला माझे कर्तृत्व माहीत आहे. भाजपकडे मी अनेक दिवसांपासून उमेदवारी मागत होते. भाजपनेही माझे काम मान्य केले होते. पण राजाच्या मुलाला राजा बनविण्यासाठी माझे बलिदान देण्यात येत आहे. पण माझ्यासाठी माझे पदवीधर बांधव, डॉक्टर, शिक्षक यांनी घरोघरी जाऊन अर्ज भरले आहेत. त्यामुळे मी ही निवडणूक लढविणारच”, असा निर्धार शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या :