Dipak Kesarkar | पंकजा मुंडेंना ठाकरे गटाकडून आलेल्या ऑफरची दीपक केसरकरांनी उडवली खिल्ली

Dipak Kesarkar | मुंबई : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या भाजपमध्ये नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडून त्यांना आपल्या गटात घेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. पंकजा मुंडे यांनी आमच्यासोबत यावं, असं म्हणत ठाकरे गटाने त्यांना खुली ऑफरच दिली आहे. ठाकरे गटाच्या या आवतनाची शिंदे गटाचे नेते, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी चांगलीच खिल्ली उडवली आहे.

“पंकजा मुंडे ठाकरे गटामध्ये येऊन नेमकं काय करणार? पंकजा यांना ते राज्यसभेवर तर पाठवू शकत नाहीत. तेवढी संख्या त्यांच्याकडे नाही”, असा खोचक टोला दीपक केसरकर यांनी लगावला आहे. “आधीच त्यांची बोलणी प्रकाश आंबेडकरांशी सुरू आहे. तिथेही राष्ट्रवादीवर विश्वास नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यापेक्षा ते बाळासाहेबांच्या विचारांवर ठाम राहिले असते तर ही परिस्थिती आली नसती. संजय राऊत (Sanjay Raut) म्हणतात समन्वय हवा. त्यांना राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं असेल”, असा चिमटाही दीपक केसरकरांनी काढला आहे.

‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत’, असे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले होते. त्यावरही केसरकरांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अजित दादांना घाई झाली असावी. आताच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना आघाडीवर होती. हे सर्वांनाच माहीत आहे, असेही दीपक केसरकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

Back to top button