Share

Chitra Wagh | चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांकडून दखल; उर्फी जावेदला पाठवली नोटीस

Chitra Wagh | मुंबई : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि फॅशन आयकॉन उर्फी जावेद यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. हा वाद चांगलाच पेटला आहे. उर्फीच्या कपड्यांवरुन अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावरदेखील नेटकऱ्यांनी उर्फीच्या फॅशनवरुन संतप्त प्रतिक्रिया दिल्या गेल्या आहेत.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत पुन्हा उर्फीच्या तोकड्या कपड्यांवर आक्षेप घेतला. “मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, तुमच्यात जितका दम आहे तितकं तुम्ही करा. उर्फी जावेदच्या कपड्यांना माझा विरोध कालही होता आजही आहे आणि उद्याही राहणार. त्यामुळे हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही. ही माझी ठाम भूमिका आहे. तुम्हाला काय करायचं ते करा”, असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

आता उर्फी जावेदच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलिसांची उर्फी जावेदला नोटीस पाठवली आहे. अंबोली पोलिस ठाण्यात होणार उर्फी जावेदची चौकशी उर्फीला आज हजर होण्याची नोटीस जारी. चित्रा वाघ यांच्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली आहे. आज उर्फीला चौकशीसाठी हजर रहाण्याची नोटीस बजावली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी एक ट्विट करत, “महाराष्ट्रात नंगानाच चालू देणार नाही”, असं म्हणत उर्फी जावेदच्या अटकेची मागणी केली होती. त्यानंतर आता अंबोली पोलिसांनी वाघ यांच्या तक्रारीची दखल घेत उर्फीला नोटीस बजावली आहे. उर्फीच्या चौकशीनंतर या उर्फीची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

महत्वाच्या बातम्या :

Chitra Wagh | मुंबई : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि फॅशन आयकॉन उर्फी जावेद यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु …

पुढे वाचा

Entertainment Maharashtra Marathi News Mumbai Politics