Ajit Pawar | “कायदा बिघडवण्याचा प्रयत्न करणारा कितीही मोठ्या बापाचा असला….”

Ajit Pawar | पुणे : आपल्या स्पष्ट वक्तेपणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे नेहमी चर्चेत असतात. आज पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये त्यांनी असेच सणसणीत वक्तव्य केले आहे. “आपल्या राज्यात कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कुणीही करू नये अगदी अजित पवारानेही नाही तसाच तो शेवटच्या माणसानेही करू नये. कायदा बिघडवण्याचा कुणी प्रयत्न कुणी केला तर कुणीही किती मोठ्या बापाचा असेल, विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे”, अशी आक्रमक भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे.

“मध्यंतरी कोयता गँग कोयता गँग म्हणत होते. सभागृहात असे सटकवले मी सरकारला म्हटलं हे काय चाललं आहे काही धाक आहे की नाही?” असे म्हणत अजित पवार यांनी सरकारला जाब विचारला आहे. एवढंच नाही तर आपल्या भाषणात त्यांनी कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारचा समाचार देखील घेतला आहे.

“पोलिसांचं काम नाही का कायदा आणि सुव्यवस्था राखणं? जे काही व्हायचं असेल ते कायद्याच्या कक्षेतच झालं पाहिजे. राज्यात सगळ्यांना समान अधिकार आहेत. मलाही तोच नियम लागू आहे जो सामान्य माणसाला लागू आहे” असंही अजित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :