Kirit Somaiyya | मुंबई : भाजप नेतेचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर चांगलाच निशाणा साधला जातो आहे. किरीट सोमय्या यांनी यावेळी संजय राऊत यांना मोठा धक्का दिला आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले सुजीत पाटकर यांच्या कंपनी विरोधात मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कोरोना काळात बनावट कंपनीच्या माध्यमातून कंत्राट मिळवल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर इटर्नल हेल्थकेअर कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबई महापालिकेचे कोरोना काळात वेगवेगळे टेंडर निघत होते. त्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. किरीट सोमय्या यांनी याआधी देखील एका कंपनीच्या विरोधात आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी इटर्नल हेल्थकेअर कंपनीच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यामुळे संबंधित कंपनीच्या विरोधातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सुजीत पाटकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Pankaja Munde | ‘मातोश्री’चे दार उघडे, पंकजा मुंडेंच्या पक्षांतराच्या चर्चेला उधाण; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
- Aaditya Thackeray | “मुंबईची लूट हेच खोके सरकारचे धोरण”; आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर गंभीर आरोप
- Budget 2023 | केंद्रीय अर्थमंत्री 1 फेब्रवारीला संसदेसमोर मांडणार अर्थसंकल्प
- Chandrashekhar Bawankule | “काँग्रेसला स्वत:ची माणसे सांभाळता येत नाहीत म्हणून ते…”; चंद्रशेखर बावनकुळेंची बोचरी टीका
- Urfi Javed | उर्फी जावेदचा चित्रा वाघ यांना झटका; महिला आयोगाकडे केली तक्रार