Devendra Fadnavis | “योग्यवेळी योग्य गोष्टींचा खुलासा करू”; फडणवीसांचं सूचक वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Devendra Fadnavis | पुणे : नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये सुरु असलेल्या राजकीय नाट्याची जोरदार चर्चा रंगली आहे. ऐनवेळी काँग्रेस नेते डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. एबी फॉर्म असूनही त्यांनी अर्ज भरला नाही. मात्र, त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे (Satyajeet tambe) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने खळबळ उडाली आहे. सुधीर तांबे यांनी मुलाचा विजय सोपा व्हावा म्हणून ही खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.

भाजपची या खेळीला फूस असल्याचीही चर्चा आहे. ही चर्चा सुरू असतानाच नाशिकची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं ठाकरे गटाच्या संजय राऊतांकडून सांगण्यात आले आहे. या सगळ्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “योग्यवेळी योग्य गोष्टी कळतील”, असे सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपच्या उमेदवार शुभांगी पाटील या ‘मातोश्री’वर गेल्या आहेत. त्यांना ठाकरे गटाकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्यावरही फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ठिक आहे. योग्यवेळी योग्य गोष्टींचा खुलासा करू”, असेही सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या :