Share

Nitesh Rane | “पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किती हिंदू द्वेष करणार?”; नितेश राणेंचा खोचक सवाल

Nitesh Rane | मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे. शिंदे विरुद्ध ठाकरे गटात कलगीतुरा रंगलेला आहे. तर दुसरीकडे विरोधक सत्ताधारी पक्षांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. अशा परिस्थितीत ख्रिस्ती समजावरील अन्यायाविरोधात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवलं आहे.

या संदर्भात भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर जोरदार टीका केली आहे. “अन्याय कोण कोणावर करतो आहे हे माहिती घेऊन बोलले पाहीजे, असं नितेश राणे (Nitesh Rane) ट्विटमध्ये म्हणालेत.

हिंदूंचे फसवणुक करुन होणारं धर्मांतराला पण हा पाठींबा नाही का?, असा सवालही त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना केला आहे. त्याचबरोबर असा सरसकट पाठिंबा देणे म्हणजे हिंदू समाजाचा अपमान असल्याचंही नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे. ‘एपीबी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीच्या बातमीचा व्हिडीओ शेअर करत नितेश राणेंनी हे ट्विट केलं आहे.

याशिवाय, “पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किती हिंदू द्वेष करणार?” असा प्रश्न उपस्थित करत नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. केली आहे. ख्रिस्ती समाजाबद्दल गैरसमज पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी,  अशी विनंती या पत्राद्वारे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

Nitesh Rane | मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे. शिंदे विरुद्ध ठाकरे गटात कलगीतुरा रंगलेला आहे. तर …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now