Sanjay Shirsat VS Shivsena | “संजय शिरसाट राजकारणातला नाचा”; युवासेनेची जहरी टीका

Shivsena | सोलापूर : शिवसेनेत फूट पडून सेनेचे ठाकरे आणि शिंदे गट तयार झाल्यापासून राज्यातील शिवसेनेचे नेते ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटातील अनेक नेत्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना टीकेचे लक्ष्य केले. अतिशय खालच्या पातळीत संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात आली. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊतांना ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ऐकून संजय राऊतांनी शिवसेना बुडवली आहे’, असे म्हणाले होते. त्यावरुन आता युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी शिरसाटांवर जहरी टीका केली आहे.

“संजय शिरसाट यांच्या जिभेला हाडच राहिलेलं नाही. संजय शिरसाट यांचं असं म्हणणं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे ऐकून यांनी महाराष्ट्र संपवला. महाराष्ट्रातील राजकारण संपवलं. उद्धवस्त केलं. या लोकांना राजकारणातला नाचा म्हणावा लागेल. संजय शिरसाट हे राजकारणातला नाचा आहेत. असं मला वाटतंय”, अशा शब्दात शरद कोळी यांनी संजय शिरसाट यांनी टीकेला उत्तर देताना म्हटलं आहे.

“संजय शिरसाट यांची घर का ना घाट का अशी अवस्था झाली आहे. जेवण करताना गल्लीतलं कुत्र जर आल्यावर त्या जेवण करणाऱ्या माणसाने तुकडा टाकला तर ते कुत्र देखील त्या तुकड्याची जाण ठेवतं. पण तुम्हाला तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 40 ते 45 वर्षे तुम्हाला सांभाळलं, तुमचं कुटुंब सांभाळलं असून पण तुम्ही तुमच्या जीभेला हाड नसल्यासारखं बोलताय, हे अत्यंत चुकीचे आहे. 2024ला याची तुम्हाला परत फेड करावी लागेल. तुम्हाला राजकारणातून उद्ध्वस्त केल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाहीत”, असे शरद कोळी म्हणाले आहेत.

दरम्यान, शरद कोळी यांनी संजय शिरसाटांवर सडकून टीका केली. संजय शिरसाटांनी उद्धव ठाकरेंची जाणीव ठेवली नाही, असं शरद कोळी म्हणाले आहेत. शरद कोळी यांच्या या टीकेवर आता संजय शिरसाट काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.