NCP | “मुख्यमंत्र्यांची खासदारांसोबतची बैठक म्हणजे वरातीमागून घोडे”; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची जहरी टीका 

NCP | मुंबई : केंद्र सरकारकडून उद्या अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांची बैठक बोलवली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.

“केंद्रीय अर्थसंकल्प दिनांक १ फेब्रुवारीला सादर होणार आहे. फक्त एक दिवस बाकी असताना, महाराष्ट्राच्या विकासासाठी खासदार केंद्रीय अर्थसंकल्पात सूचना कशा जोडू शकतात. मुख्यमंत्र्यांना दिनांक १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प आहे हे आठवते का?”, असा सवाल महेश तपासे यांनी केला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्व खासदारांची बैठक बोलावणे म्हणजे पब्लिसिटी स्टंट असल्याचं देखील ते म्हणालेत. मुख्यमंत्र्यांची बैठक म्हणजे वरातीमागून घोडे असेच म्हणावे लागेल, अशी जोरदार टीका महेश तपासे यांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील विकास कामांबाबत जर गंभीर असते तर त्यांनी किमान महिनाभरापूर्वी सर्व खासदारांची बैठक बोलावायला हवी होती आणि केंद्र सरकारच्या सर्व प्रकल्पांचा आणि विविध योजनांसाठीच्या आर्थिक वाटपाचा आढावा घ्यायला हवा होता. त्यानंतर त्यांनी अर्थमंत्रालयाकडे सूचना पाठवायला हव्या होत्या.”

दरम्यान, आजच्या खासदारांच्या बैठकीला आम्ही खासदार जाणार नाही कारण सध्या या बैठकीची चेष्ठा सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परंपरेला काळीमा फासलाय आहे अशी टीका मुख्यमंत्र्यांवर करण्यात आली आहे. त्या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी आम्ही जाणार नाही असं स्पष्टपणे त्यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :

Back to top button