Sanjay Shirsat | “संजय राऊत हा राजकारणातला जोकर”; संजय शिरसाटांची एकेरी भाषेत टीका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Shirsat | मुंबई : रविवारी 29 जानेवारी रोजी मुंबईत ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’चं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना भवनाच्या परिसरातच हा मोर्चा काढण्यात आला त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. यावरून तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यातच सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटानं या मोर्चेकऱ्यांवर परखड भूमिका मांडत मोर्चे करणाऱ्यांवर आणि राज्य तसेच केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना देखील मोर्चा काढणाऱ्यांवर टीका केली आहे.

आजच्या सामनाच्या मुख्यपृष्ठावर वरील भागात मोठ्या छायाचित्रासह राहुल गांधींची बातमी आणि त्याच पृष्ठावर खाली हिंदू जनआक्रोश मोर्चाची बातमी लावण्यात आल्याने, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर एकेरी भाषेत टीका केली आहे.

काय म्हणाले संजय शिरसाट?

“मी वारंवार सांगत आलोय की संजय राऊत हा वेडा माणूस आहे. आजच्या घडीला संजय राऊत हा राजकारणातला जोकर आहे. तो नेमकं काय करतोय हे त्याला सुद्धा कळत नाही. संजय राऊत हा असा व्यक्ती आहे की राहुल गांधींचा फोटो आणि शरद पवारांचा फोटो हा शिवसेना भवनात लावायला कमी करणार नाही”, असे संजय शिरसाट म्हणाले आहेत.

“सर्वधर्म समभावाची व्याख्या त्याला पाठ झालेली आहे. ज्याचा विरोध शिवसेना प्रमुखांनी केला होता, जे गाडलेले मुडदे आहेत त्यांना जिवंत करण्याचं काम संजय राऊत करतो आहे. म्हणून संजय राऊतला आणखी हिंदुत्व कळायला फार अवकाश आहे. शिवसेना संपली असं समजूनच तो अशी विधानं करत आहे. आता कदाचित शेवट काय करायचा आहे, या विवंचनेत तो सुद्धा आहे”, असेही संजय शिरसाट म्हणाले आहेत.

“या निवडणुकीचा जेव्हा निकाल लागेल तेव्हा आपल्याला लक्षात येईल, की महाविकास आघाडी जरी झाली तरी शिवसेना(शिंदे गट) आणि भाजपने जी रणनीती आखलेली आहे, त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. अनेक ठिकाणचा पराभव महाविकास आघाडीने मान्य केलेला आहे, या पराभवला आता कसं पचवावं या विवंचनेत ते लोक आहेत” अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिली आहे.

महत्वाच्या बातम्या