Weather Update | थंडीचा कडाका वाढणार, हवामान विभागाकडून अलर्ट

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या अनेक दिवसांपासून हवामानामध्ये सातत्याने बदल होताना दिसत आहे. देशात कुठे थंडी (Cold) तर कुठे मुसळधार पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे थंडी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट शेतीतील पिकांवर होताना दिसत आहे.

दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे थंडीचा तडाका वाढला आहे. तर उत्तर प्रदेशमधील अनेक भागात गारांसह पाऊस झाला आहे. राजस्थानच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली होती. अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे देशातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. वेस्टर्न डिस्टबर्नच्या प्रभावामुळे वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. उत्तर भारतामध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडे वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, किमान तापमान घट होणार असून पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. या बदलत्या  वातावरणाचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून सातत्याने केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या