Share

Anil Parab | अनिल परब यांचे किरीट सोमय्यांना ओपन चॅलेंज; म्हणाले…

🕒 1 min read Anil Parab | मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असतात. आरोप केलेल्या नेत्यांच्या विरोधात पुरावे सादर करत ईडीच्या चौकशीपर्यंत पोहचवतात. शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांचे कार्यालय अनधिकृत असल्याचा दावा केला होता. अनिल परब यांचे अनधिकृत कार्यालय … Read more

Published On: 

🕒 1 min read

Anil Parab | मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असतात. आरोप केलेल्या नेत्यांच्या विरोधात पुरावे सादर करत ईडीच्या चौकशीपर्यंत पोहचवतात. शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांचे कार्यालय अनधिकृत असल्याचा दावा केला होता. अनिल परब यांचे अनधिकृत कार्यालय तोडण्यात आलं, त्या ठिकाणी किरीट सोमय्या जाणार आहेत. या सगळ्याच्या आधी अनिल परब यांनी आपली भूमिका मांडली आणि पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांवर आरोप केले आहेत.

“किरीट सोमय्यांनी मराठी माणसाला या ठिकाणी राहू द्यायचं नाही, त्याचा फायदा होऊ द्यायचा नाही हे धोरण ठरवत बिल्डर्सकडून सुपारी घेतली आहे. हा किरीट सोमय्या जे काही करतो आहे त्याला भाजपचं समर्थन आहे का? किरीट सोमय्या इथे येऊ द्या त्याचं स्वागत आम्ही आमच्या पद्धतीने करू, कारण मराठी माणसाच्या हिताच्या आड कुणी आलं तर मी आणि शिवसेना गप्प बसणार नाही” असा इशारा अनिल परब यांनी किरीट सोमय्यांना दिला आहे.

“सोमवारपासून एक बातमी वृत्तवाहिन्यांवर देण्यात येते आहे. अनिल परब यांचं अनधिकृत कार्यालय तोडलं गेलं. ही इमारत 1960 मध्ये बांधण्यात आली. माझा जन्म याच इमारतीत झाला. या इमारतीत मी लहानाचा मोठा झालो. मी जेव्हा आमदार झालो तेव्हा या इमारती या आता मालकीच्या झाल्या म्हाडाकडे राहिल्या नाहीत असं मला इमारतीच्या लोकांनीच सांगितलं. माझं कार्यालय इथेच होतं. अनेक वर्षे ही जागा मी वापरत होतो. मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा किरीट सोमय्यांनी म्हाडा, लोकायुक्त यांच्याकडे जाऊन माझं अनधिकृत कार्यालय आहे हे भासवून मला नोटीस द्यायला लावली. किरीट सोमय्यांनी बिल्डर्सकडून सुपारी घेतली आहे” असा गंभीर आरोप देखील अनिल परब यांनी केला आहे.

‘सोमय्यांना माझं आव्हान’

“आज प्रत्येकाच्या मनात ही भीती आहे की या ऑर्डरचा फायदा घेऊन ब्लॅकमेल केलं जाईल असं वाटतं आहे. आम्ही म्हाडालाही याबाबतचा जाब विचारणार आहोत असंही अनिल परब आहे. 20 वर्षांपूर्वीचं एक प्रकरण अजून म्हाडाकडे पेंडिंग आहे. किरीट सोमय्यांना माझं आव्हान आहे नारायण राणेंचं घर तोडण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. माझ्यासोबत किरीट सोमय्या ती तोडक कारवाई बघायला येणार का?” असाही खोचक प्रश्न अनिल परब यांनी विचारला आहे.

‘…तर मी आणि शिवसेना गप्प बसणार नाही’

“मी म्हाडाला जागा मोकळी केल्याचं पत्रही दिलं आहे. किरीट सोमय्या कोण आहे? म्हाडाचे अधिकारी आहेत का? ते इथे का येणार आहेत असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे. आम्ही किरीट सोमय्यांना आव्हान देतो आहे हिंमत असेल तर ये इकडे तुझं स्वागत करायला आम्ही तयार आहोत असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे. गरीब कुटुंबाचं नुकसान कुणी करणार असेल तर मी आणि शिवसेना गप्प बसणार नाही. गरीबांच्या पोटावर भाजप आणि किरीट सोमय्या येणार असतील आम्ही कुणीही शांत बसणार नाही. मी यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही भेटणार आहे” असंही अनिल परब म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या