Share

Kirit Somaiya | “वांद्रेतील इमारत पाडली, आता दापोलीतील रिसॉर्ट कधी पाडणार?”; किरीट सोमय्यांचा अनिल परबांना सवाल 

🕒 1 min read Kirit Somaiya | मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांचं कार्यालय पाडण्यात आलंय. ते कार्यालय पाहण्यासाठी किरीट सोमय्या निघाले आहेत. पण त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आलं आहे. त्याचवेळी माजी मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अडवू नये. … Read more

Published On: 

🕒 1 min read

Kirit Somaiya | मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांचं कार्यालय पाडण्यात आलंय. ते कार्यालय पाहण्यासाठी किरीट सोमय्या निघाले आहेत. पण त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आलं आहे. त्याचवेळी माजी मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, “किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अडवू नये. त्यांनी इथं यावं. आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. आमच्या स्टाईलने आम्ही त्यांचं स्वागत करू.” त्यानंतरही सोमय्या अनिल परब यांचं कार्यालय असणाऱ्या ठिकाणी जाण्यावर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी माध्यमांशी बोलताना अनिल परब यांच्यावर टीका केली आहे.

अनिल परब (Anil Parab) यांच्या वांद्रे गांधीनगर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या अवैध बांधकामाविरोधात म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून आज (मंगळवारी) हातोडा चालविण्यात येणार होता. मात्र त्यापूर्वीच हे बांधकाम पाडण्यात आलं. दरम्यान, यावरून किरीट सोमय्यांनी परब यांच्यावर निशाणा साधलाय.

“वांद्रे येथील इमारत पाडली, आता दापोलीतील रिसॉर्ट कधी पाडणार?”, असा प्रश्न सोमय्या यांनी अनिल परब यांना विचारला आहे. २०२१ मध्ये लोकायुक्तांच्या सुनावणीत हे कार्यालय पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांच्यावर मातोश्रींचे दहा हातांचा आशीर्वाद असल्याने ही इमारत तोडायला थोडा उशीर झाला”, असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावला.

दरम्यान, “किरीट सोमय्यांनी मराठी माणसाला या ठिकाणी राहू द्यायचं नाही, त्याचा फायदा होऊ द्यायचा नाही हे धोरण ठरवत बिल्डर्सकडून सुपारी घेतली आहे. हा किरीट सोमय्या जे काही करतो आहे त्याला भाजपचं समर्थन आहे का? किरीट सोमय्या इथे येऊ द्या त्याचं स्वागत आम्ही आमच्या पद्धतीने करू, कारण मराठी माणसाच्या हिताच्या आड कुणी आलं तर मी आणि शिवसेना गप्प बसणार नाही” असा इशारा अनिल परब यांनी किरीट सोमय्यांना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

[emoji_reactions]

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या