Share

Rain Update | शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ, राज्यात मराठवाड्यासह ‘या’ भागात अवकाळी पावसाचा इशारा

🕒 1 min read Rain Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी किमान तापमानात (Temperature) काही अंशाने घट झाली आहे. राज्यात पुढचे चार ते पाच दिवस साम्य थंडी जाणवणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर, बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य … Read more

Published On: 

🕒 1 min read

Rain Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी किमान तापमानात (Temperature) काही अंशाने घट झाली आहे. राज्यात पुढचे चार ते पाच दिवस साम्य थंडी जाणवणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर, बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यामध्ये 2 फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये थंडीच्या लाटेची परिस्थिती निर्माण होणार आहे. तर मुंबईत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी होऊ शकते. राज्यात काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

मराठवाडा आणि विदर्भामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. आधीच वाढत्या थंडीचा परिणाम शेतीतील पिकांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यात आता पुन्हा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहे. कधी थंडी तर कधी मुसळधार पाऊस पडत आहे. या वातावरणाचा रब्बी हंगामावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. बदलत्या वातावरणामुळे शेतीतील पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. गहू, हरभरा, मक्का या पिकांना वातावरणाचा फटका बसणार असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Agriculture

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या