Job Vacancies | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी मेगा भरती सुरू होणार

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी (Govt Job) शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणजेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रशासन कर्मचाऱ्यांसाठी मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये लिपिक पदांच्या मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या भरती प्रक्रियेबद्दल नुकतीच घोषणा केली आहे.

सध्या राज्य शासन महानगरपालिका प्रशासनातील रिक्त पदांचा आढावा घेत आहे. राज्यातील पालिका प्रशासनामध्ये तब्बल 40000 रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेत सर्वात जास्त पदे भरण्यात येणार आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सर्वाधिक पद भरले जाणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांच्या 985 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, डॉक्टर, नर्स, सुरक्षारक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, परिचर, सफाई कामगार, अधिकारी, अंगणवाडी सेविका इत्यादी पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाने केलेल्या घोषणेनुसार, राज्यातील सर्व महानगरपालिकेतील रिक्त पदे 15 मेच्या आधी भरण्यात येणार आहे. राज्य सरकारने ही भरती प्रक्रिया 15 मे च्या आधी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी http://www.pcmcindia.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.