Shivsena | परबांच्या समर्थनार्थ शिवसैनिक म्हाडा कार्यालयात; सोमय्या-परब वाद चिघळला

Shivsena | मुंबई : शिवसेना नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक म्हाडाच्या बीकेसीतील कार्यालयामध्ये घुसले आहेत. बांद्रा येथील म्हाडा वसाहतीमध्यचे शिवसेना आमदार अनिल परब यांच्या कार्यालयाच्या पाडकामाच्या मुद्द्यावरुन राज्याचं राजकारण चांगलचं तापलं आहे. विशेष म्हणजे ज्या कार्यालयाचं बांधकाम आज पाडण्यात आलं, तिथं अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. त्यावरुन हे प्रकरण चांगलंच चिघळलं आहे.

म्हाडाच्या कार्यालयामध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक होत घुसले आणि अनिल परब यांच्या समर्थनार्थ तर किरीट सोमय्या यांच्या विरोधात आता दोरदार घोषणाबाजी केली जात आहेत.

“पाडकाम केलेलं कार्यालय अनधिकृत नव्हतं. किरीट सोमय्यांनी बिल्डरांकडून सुपारी घेतली आहे,” असा घणाघात शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनिल परब (Anil Parab) यांनी किरीट सोमय्यांसह (Kirit Somaiya) भाजपवरही टीका केली.

कार्यालयाचं पाडकाम पाहायला वांद्रे इथे येणाऱ्या किरीट सोमय्या अनिल परब यांनी आव्हान दिलं. “त्यांना इथे यायचं असेल तर पोलिसांनी त्यांना अडवू नये. त्यांनी इथे यावं, आम्ही स्वागत करायला तयार आहोत. त्यांनी शिवसैनिकांचा पाहुणचार अनुभवावा,” असं अनिल परब म्हणाले. तर किरीट सोमय्यांना पोलिसांनी बीकेसीमध्येच रोखलं. संभाव्य वादाची परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी खबरदारी म्हणून किरीट सोमय्यांना अनिल परब यांच्या निवासस्थानी जाण्यापासून अडवलं असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button