Sadabhau Khot | “रोहित पवार सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले”; सदाभाऊ खोत यांची बोचरी टीका 

Sadabhau Khot | पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील अलका चौकात साष्टांग दंडवत आंदोलन सुरु केले आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न 2025 पासून राबविण्यात यावा. ही प्रमुख मागणी विद्यार्थ्यांची आहे. ही मागणी मान्य न झाल्यास लढा तीव्र करण्याचा इशारा मुलांनी दिला आहे. यावेळी बोलताना सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

तुम्ही केवळ प्रसिद्धीकरीत आंदोलनात सहभागी झाला आहात, अशी टीका रोहित पवार यांनी केली होती. यावर सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर दिल आहे.”रोहित पवार हे महान नेते आहेत. महान नेत्यांच्या बाबतीत शेतकर्‍यांच्या मुलांने काय बोलावे. त्यांच्याच सरकाराच्या काळात एवढे चांगले निर्णय घेतले की, विद्यार्थ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या”, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला.

त्याचबरोबर रोहित पवार हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत, असं म्हणत त्यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, गैरप्रकार टाळण्यासाठी या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या आंदोलनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalakar) आणि आमदार अभिमन्यू पवार हे नेते सहभागी झाले.

राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न 2023 ऐवजी 2025 पासून लागू करण्यात यावा. या मागणीसाठी पुण्यात वेळोवेळी विद्यार्थी एकत्रित येत आंदोलन करत आहेत. यापूर्वी देखील पुण्यातील शास्त्री मार्गावर अहिल्यादेवी शिक्षण मंडळ आणि अलका टॉकीज चौकात आंदोलन करण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.