#BigNews | आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा; 2013 मधील बलात्कार प्रकरणी गांधीनगर सत्र न्यायालयाचा निर्णय

#BigNews | गांधीनगर : गुजरातमधील गांधीनगरच्या सत्र न्यायालयाने आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. याबाबत न्यायालयाने सोमवारी सुनावणी केली होती. विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वयंघोषित धर्मगुरू आसारामला गुजरातमधील गांधीनगर येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डीके सोनी यांनी सोमवारी 2013 साली दाखल झालेल्या या बलात्कार प्रकरणात आसारामला दोषी ठरवले, तर आसारामच्या पत्नीसह इतर सहा जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

चांदखेडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, अहमदाबादच्या बाहेरील आसाराम बापूंच्या आश्रमात राहत असताना 2001 ते 2006 दरम्यान या महिलेवर अनेकदा बलात्कार झाल्याचा आरोप आहे. “न्यायालयाने आसारामला कलम ३७६ २(सी) (बलात्कार), ३७७ (अनैसर्गिक लैंगिक गुन्हे) आणि भारतीय दंड संहितेच्या इतर तरतुदींनुसार बेकायदेशीर नजरकैदेत ठेवल्याबद्दल दोषी ठरवले आहे”, असे या खटल्यातील विशेष सरकारी वकील आर. सी. कोडेकर यांनी सोमवारी सांगितले आहे.

सरकारी वकिलांनी आपल्या युक्तिवादात आरोपी आसाराम बापूला जन्मठेपेची मागणी केली आहे. तसेच आरोपी हा नेहमीचा गुन्हेगार असल्याचे सांगून त्याच्यावर जबर दंडाची देखील मागणी केली आहे. न्यायालय दुपारी 3.30 वाजता या प्रकरणी निर्णय देईल. आसाराम बापू सध्या जोधपूर तुरुंगात आहेत, जिथे तो एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

गांधीनगरच्या सत्र न्यायालयाने सोमवारी आसारामविरुद्धचा खटला पूर्ण केला आणि त्याला आयपीसीच्या कलम ३७६, ३७७, ३४२, ३५४, ३५७ आणि ५०६ अंतर्गत दोषी ठरवले. महिलेच्या बलात्कार प्रकरणात आसारामची पत्नी लक्ष्मीबेन, त्यांची मुलगी आणि इतर चार शिष्यांसह सहा आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button