Supriya Sule | मुंबई: बुधवारी पहाटे मुंबई लोकलमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. चालू लोकलमध्ये महिला डब्यात तरुणीवर बलात्कार केला असल्याची मोठी घटना घडली आहे. पोलिसांनी या गुन्हेगाराला अटक केलं आहे. तर या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
मुंबई लोकलमध्ये घडलेल्या प्रकरणावर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून याला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत आहे, असं सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
Supriya Sule targets the state government
संतापजनक!
चालू लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढून एका व्यक्तीने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. ही अतिशय संतापजनक घटना आहे.यामुळे पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून याला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत आहे. या घृणास्पद घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी तपासयंत्रणांनी कार्यवाही करणे गरजेचे आहे.
संतापजनक!
चालू लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढून एका व्यक्तीने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. ही अतिशय संतापजनक घटना आहे.यामुळे पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून याला गृहखात्याची निष्क्रियता…— Supriya Sule (@supriya_sule) June 15, 2023
दरम्यान, पीडित तरुणी गिरगाववरून बेलापूरला लोकल ट्रेननं जात होती. या तरुणीचं वय 20 वर्ष आहे. परीक्षेसाठी ही तरुणी लोकलने प्रवास करत होती. डब्यामध्ये कोणी नाही, हे बघून आरोपी डब्यात शिरला आणि त्यानंतर मुलीचा छळ केला. या प्रकरणी तरुणीने लगेच पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत आरोपीला लगेच अटक केले.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | संजय राऊतांचा धमकीचा बनाव? आरोपी सुनिल राऊत यांचा कट्टर कार्यकर्ता
- Vande Bharat Express | पावसामुळे वंदे भारत एक्सप्रेसमध्ये पाणीच पाणी! पाहा VIDEO
- Sanjay Shirsat | “येणाऱ्या काळात भाजपचं अवघड…”; संजय शिरसाटांचा फडणवीस गटाला इशारा
- Devendra Fadnavis । ’50 कुठं आणि 105 कुठं? शिंदे गटाला त्यांची जागा दाखवायला लावले बॅनर्स?
- Devendra Fadnavis | भाजप आणि शिंदे गट वाद पेटला! कुणी आणि कुठे लावले बॅनर्स?