Share

Sanjay Shirsat | “येणाऱ्या काळात भाजपचं अवघड…”; संजय शिरसाटांचा फडणवीस गटाला इशारा

🕒 1 min readSanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर: भाजप (BJP) आणि शिंदे गट (Shinde group) यांच्यातील वाद वाढत चालला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या जाहिरातीवरून हा वाद सुरू झाला होता. या जाहिरातीनंतर भाजपने शिंदे गटावर नाराजी व्यक्त केली होती. यावरून दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर: भाजप (BJP) आणि शिंदे गट (Shinde group) यांच्यातील वाद वाढत चालला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या जाहिरातीवरून हा वाद सुरू झाला होता. या जाहिरातीनंतर भाजपने शिंदे गटावर नाराजी व्यक्त केली होती. यावरून दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.

Anil Bonde criticizes Eknath Shinde

या पार्श्वभूमीवर भाजप नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली होती. बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनवू शकत नाही, असा खोचक वार अनिल बोंडे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला होता. त्यांच्या या टीकेला शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Sanjay Shirsat replied bjp Anil Bonde

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “वाजपेयी यांच्या कालावधीमध्ये एका मतानं सरकार पडलं होतं. भाजपनं या गोष्टीकडं लक्ष दिलं पाहिजे. युती सरकारनं हातात हात धरून सोबत चालायला हवं. नाहीतर येणाऱ्या काळात अवघड होईल.”

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यासोबतच शिंदे गटातील शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी देखील अनिल बोंडे यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, हा वाद सुरू असताना उल्हासनगरमध्ये भाजपचे बॅनर झळकले आहे. या बॅनरच्या माध्यमातून भाजपनं शिंदे गटाला त्यांची जागा दाखवून दिली असल्याचं दिसून आलं आहे. ’50 कुठं आणि 105 कुठं? हा आमच्या भाजपचा मोठेपणा! देवेंद्र फडणवीस साहेब नाम ही काफी है’ असा मजकूर छापत भाजपनं शिंदे गटाला डिवचलं आहे. त्याचबरोबर या बॅनरवर बड्या भाजप नेत्यांचा फोटो देखील लावण्यात आलेला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!