Eknath Shinde । ‘सत्तार कारभार सुधारा…सरकारची पत धुळीला मिळवताय शिंदेंनी सत्तारांना झाप-झापले’; सत्तारांनी थेट हातच जोडले

Eknath Shinde । अकोल्यात  खत कंपनीत कृषी विभागाच्या कथित पथकाने टाकलेल्या धाडीवरून अब्दुल सत्तार वादात सापडले आहे. यावेळी कारवाईसाठी गेलेल्या पथकात खाजगी लोकांचा देखील समावेश होता. या पथकामध्ये असलेला दीपक गवळी हा माझा स्वीय सहायक नाही, अशी प्रतिक्रिया सत्तरांनी दिली होती. मात्र, एका शासकीय दौऱ्यामध्ये त्यांनी दीपक गवळीचा स्वीय सहाय्यक म्हणून उल्लेख केला होता.

कारवाईसाठी आलेल्या पथकाने पाच लाखांची खंडणी मागितली असल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Eknath Shinde comment Akola Agriculture Department Private Raid by Abdul Sattar

याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सर्वांसमोर कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना ‘झाप-झापले’. अशा घटनांमुळे सरकारची प्रतिमा खराब होत असून, यापुढे अशा घटना होऊ नयेत असा दम सत्तार यांना देण्यात आला आहे.  मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्तारांवर चांगलाच पारा चढला होता. शिंदेंचा पारा पाहून सत्तारांनी थेठ हात जोडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सत्तार, तुमचे जे चालले आहे, ते वाईट आहे. तुम्ही कारभार सुधारा, असा बेबंदपणा बरा नाही. तर तुम्ही सरकारची पत धुळीला मिळवताय, या शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी सत्तारांना झाप-झापले, असल्याचे वृत्त दिव्य मराठीने दिले आहे.

बोगस बियाणे विकणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करा 

बोगस बियाणे विक्रेत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. बोगस बियाणांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बोगस बियाणे विकणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांना जरब बसविण्यासाठी कठोर कायदा करण्याची आवश्यकता असून सध्या विभागाकडून कठोर कारवाई सुरू करण्यात आल्याने आपल्याला बदनाम केले जात आहे. त्यासाठी खोटे आरोप केले जात असल्याचे सांगत सत्तार यांनी आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला.  सत्तार यांनी सारवासारवी करत तेलंगणाचे उदाहरण देण्याचा प्रयत्न केला. बोगस बियाणे व खते विक्रीला चाप लावण्यासाठी आपल्याकडे कठोर कायदे नाहीत. तेलंगणात यासाठी विशेष कायदे असून, त्याप्रमाणे आपण देखील कायदा केला पाहिजे असं सत्तार म्हणाले. पण सत्तार यांची सारवासारव मुख्यमंत्री ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.

महत्वाच्या बातम्या –

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.