Sharad Pawar – शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीचे तीन बडे नेते ‘घड्याळ’ सोडून ‘BRS’ च्या वाटेवर

Sharad Pawar अहमदनगर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ( Chandrashekhar Roa ) यांच्या भारत राष्ट्र समितीने राज्यात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. नगर जिल्ह्यातील ३ बडे नेते सध्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाच्या वाटेवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक ठिकाणी विविध कारणांमुळे नाराजी असल्याचे दिसून येते.

श्रीगोंदा तालुक्यातील घन:श्याम शेलार सध्या हैद्राबादमध्ये गेले असून ते बीआरएसचे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ( Chandrashekhar Roa ) यांची भेट घेणार आहेत. तर कर्जत आणि पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस नेतेही बीआरएसच्या संपर्कात आहेत.

Ncp Leders Join Chandrashekhar Roa Brs Party

कर्जत मधील राष्ट्रवादीच्या नेत्याला रयत शिक्षण संस्थेच्या पदावरून काढण्यात आल्याने हा नेता नाराज होता. कर्जत मधील राष्ट्रवादीचा बडा पदाधिकारी असून त्याच्याकडे संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी होती.

तर पाथर्डी तालुक्यातील नेत्याला पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्यानेच हा नेताही बीआरएसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. पाथर्डीमधून सध्या माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या उमेदवारीची चर्चा आहे.

श्रीगोंदा विधानसभ मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी ही राहुल जगताप यांना मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे घन:श्याम शेलार बीआरएस पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीचे तीन बडे नेते BRS मध्ये गेले तर शरद पवारांना ( Sharad Pawar ) मोठा धक्का असल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या –

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.