Narayan Rane | टीम महाराष्ट्र देशा: ‘खुपते तिथे गुप्ते’ या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाचं तिसरं सीजन सुरू आहे. या सीजनमध्ये सेलिब्रेटिंसोबतच राजकीय नेतेही उपस्थिती लावत आहेत. राज ठाकरेंनंतर या कार्यक्रमामध्ये नारायण राणे सहभागी होणार आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडावर भाष्य केलं आहे.
If I was in Shivsena, this situation would not have happened – Narayan Rane
नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले, “आज मी जर शिवसेनेत असतो तर त्यांची ही अवस्था झालीच नसती. आम्ही एक आमदार इकडचा तिकडे होऊ दिला नसता, चाळीस तर सोडाच. आम्ही सगळ्यांनी पक्ष सोडून देण्याची परिस्थिती यांनीच आणली आहे.”
या कार्यक्रमामध्ये अवधूत गुप्ते सोबत बोलत असताना नारायण राणे (Narayan Rane) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर देखील टीका करताना दिसले आहे. नारायण राणे यांच्या टिकेनांतर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘खुपते तिथे गुप्ते’ या शोमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सहभागी झाली होते. त्याचबरोबर या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सहभागी होणार आहेत. तर अवधूत गुप्ते (Avadhut Gupte) या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Gautami Patil | गौतमीसोबत तिच्या आईचा व्हिडिओ व्हायरल! पाहा VIDEO
- Eknath Shinde | बोगस विक्रेत्यांवर धाडी टाकाच; अब्दुल सत्तारांच्या घोटाळेबाज धाडीवर काय कारवाई करणार
- Supriya Sule – कमी मार्काने पास झालो हे जाहिरातीतून सांगणारा एकनाथ शिंदेंचा पहिलाच पक्ष – सुप्रिया सुळे
- Ajit Pawar | एकनाथ शिंदेंनी जाहिरातबाजीतून स्वतःचं हसू करून घेतलय – अजित पवार
- Cabinet Decisions । महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय १३ जून २०२३