Share

Ajit Pawar | एकनाथ शिंदेंनी जाहिरातबाजीतून स्वतःचं हसू करून घेतलय – अजित पवार

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: राज्याच्या राजकारणात दररोज काही ना काही घडामोडी घडत असतात. अशात राज्यातील उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? या संदर्भात एक जाहिरात छापण्यात आली होती. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पसंती मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहे. यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी … Read more

Published On: 

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: राज्याच्या राजकारणात दररोज काही ना काही घडामोडी घडत असतात. अशात राज्यातील उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? या संदर्भात एक जाहिरात छापण्यात आली होती. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पसंती मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहे. यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Eknath Shinde forgot Balasaheb Thackeray – Ajit Pawar

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही जाहिरात शिवसेनेकडून देण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे. मात्र, या जाहिरातीमध्ये कुठेच बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नाही. यावर बोलताना अजित पवार म्हणाले (Ajit Pawar), “एकनाथ शिंदे किंवा जाहिरात देणारे एवढ्या लवकर कसं काय बाळासाहेब ठाकरे यांना विसरले? काय माहित. शिंदे गट म्हणतो आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आहोत. मात्र त्या जाहिरातीमध्ये कुठेही बाळासाहेबांचा फोटो नाही.”

पुढे बोलताना ते (Ajit Pawar) म्हणाले, “अशा प्रकारच्या जाहिराती आम्ही कधी बघितल्या नाही. जाहिरातीमध्ये बाळासाहेबांचा फोटो न वापरून तुम्ही त्यांना अपमान केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षा एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता जास्त आहे, हे भाजपला मान्य आहे का?”

“एकनाथ शिंदे यांनी ही जाहिरात करून स्वतःचं हसू करून घेतलं आहे. लोकप्रियता दाखवण्यासाठी सत्ताधारी पक्ष स्वतःमध्ये स्पर्धा करत आहे. तुम्हाला जर खरंच जनतेचं मत जाणून घ्यायचा असेल, तर उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर करा”, असं आवाहन देखील अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी बोलताना केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही