Viral Post | नोकरीच्या नावाखाली फसवणाऱ्याला मुलींनं घडवली अद्दल! नक्की काय आहे प्रकरण?

Viral Post | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल ऑनलाईन गोष्टींची जेवढे फायदे आहेत, तेवढे तोटे देखील आहेत. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सायबर क्राईमच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. नोकरीचं आमिष दाखवून अनेक चोर नागरिकांची फसवणूक करतात. अशात ऑनलाईन फसवणूक करणाऱ्याला चोरट्याला एका मुलीने चांगलाच धडा शिकवला आहे.

काजल नावाच्या एका मुलीला चोरट्यानं फसवण्याचा प्रयत्न केला (Viral) होता. या चोरट्याला तिनं चांगलीच अद्दल घडवली आहे. काजलने या चोरट्यासोबत झालेली चॅट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

I’m going to commit suicide – Kajal

तुला अमेरिकेत एका मोठ्या कंपनीत जॉब ऑफर (Viral) देण्यात आली आहे. त्याचबरोबर एका दिवसात तू 7 लाख रुपये कमवू शकते, असा मेसेज तिला आला होता. त्यावर तिनं संशय आल्यानंतर ‘मी आत्महत्या करणार आहे’, असं उत्तर दिलं. काजलच्या या प्रतिक्रियेनंतर त्या व्यक्तीनं तिला पुन्हा एकदा संपूर्ण ऑफर समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर काजलनं पुन्हा एकदा मी आत्महत्या करणार आहे, त्यामुळे मी या पैशाचं काय करू? असं उत्तर दिलं.

सध्या सोशल मीडियावर ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत आहे. या पोस्टमध्ये काजलनं त्या चोरट्याला चांगलाच धडा शिकवला आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर या मुलीचा मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.