Mukund Kirdat | वारकऱ्यांवर लाठीमार हे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांना त्रास देणाऱ्या मानसिकतेचे प्रतिबिंब: मुकुंद किर्दत, आप

Mukund Kirdat | Press Note Aap | आळंदीहून पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होत असताना वारकऱ्यांना पोलिसांनी लाठीमार केल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. आम आदमी पार्टीने याचा तीव्र शब्दात निषेध केला असून यासंदर्भात शिंदे फडवणीस सरकारने वारकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

माऊलीच्या भेटीची आस घेऊन लाखो वारकरी या पालखीमध्ये सामील होतात. या पालखीला 300 पेक्षा अधिक वर्षाची परंपरा आहे आणि वारकरी संप्रदाय हा भक्तिमार्गाने जाणारा, सर्व परिस्थितीशी विनातक्रार जुळवून घेत माऊलीच्या ओढीने हा वर्षानुवर्षे यात्रेचा प्रवास करीत असतो. या परंपरे ला गालबोट लागणारी घटना घडल्याचे आजवर कधीही समोर आलेले नाही. परंतु आज पोलिसांनी लाठीमार व बळाचा वापर केला. हे करण्यासाठी पोलिसांना आदेश कुणी दिले होते? गृहमंत्री पद सांभाळणारे फडणवीस यांनी याबाबत दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नाही. असे किर्दत म्हणाले.

when the BJP was in power, there was a fear that the snake would be released in Wari

२०१८ मध्ये भाजप सत्तेत असताना वारीमध्ये साप सोडली जाण्याची भीती व्यक्त करून वारकऱ्यांमध्ये गोंधळ उडवला गेला होता. आताही भाजप आणि शिंदे गट सत्तेत असताना ही घटना घडली आहे. वारकऱ्यांसोबतचा लाठीमार आणि बळाचा वापर होताना आज भाजप च्या खऱ्या मानसिकतेचे दर्शन जनतेस झाले आहे. फडणवीस यांची क्रूर चेहरा समोर आला आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांना त्रास देणाऱ्या सनातनी मानसिकतेचेच हे प्रतिबिंब आहे. अशी टीका त्यांनी केली आहे.

आम आदमी पार्टी या लाठीमाराचा निषेध करीत असून यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा यांनी वारकरी संप्रदायाची सपशेल माफी मागावी अशी मागणी आप ने केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.