Share

Chandrashekhar Bawankule | आळंदीमध्ये लाठीचार्ज झाला नाही, कोणत्याही गोष्टीचं राजकारण करू नका – चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule | नागपूर: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा सुरू असताना वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला असल्याची माहिती समोर आली होती. याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वारकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज झालेला नाही, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. There is no lathicharge on varkari आळंदीमध्ये घडलेल्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) … Read more

Published On: 

Chandrashekhar Bawankule | नागपूर: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा सुरू असताना वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला असल्याची माहिती समोर आली होती. याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वारकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज झालेला नाही, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.

There is no lathicharge on varkari

आळंदीमध्ये घडलेल्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “आळंदीमध्ये पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांवर लाठीचार्ज झालेला नाही. या घटनेवरून विरोधक फक्त राजकारण करत आहेत. विरोधकांनी याचं राजकारण करू नये.”

पुढे बोलताना ते (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “काल घडलेल्या प्रकरणाची सीसीटीव्ही फुटेज समोर आली आहे. त्या फुटेजमध्ये पोलीस वारकऱ्यांना लाठीचार्ज करताना दिसत नाही. पोलीस फक्त मंदिरामध्ये प्रवेश करण्यावरून वारकऱ्यांना थांबवत आहे. तरीही विरोधकांना या गोष्टीचा राजकारण करायचं आहे.”

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आळंदीमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली होती. तेव्हा देखील असाच काहीतरी प्रकार घडला होता. मात्र, त्या गोष्टीचं आम्ही राजकारण केलं नव्हतं,” असही ते (Chandrashekhar Bawankule) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही