🕒 1 min read
बारामती: राज्यात सध्या हिंदी भाषेच्या सक्तीवरून सुरू असलेल्या वादानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्रिभाषा सूत्राबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “पहिलीपासून मातृभाषा असली पाहिजे, यात दुमत नाही, मात्र पाचवीपासून तिसऱ्या भाषेचा पर्याय असावा आणि ती कोणती भाषा असावी हे पालकांनी ठरवावे,” असे अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी बारामती येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक निकालानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या विषयावर लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. मराठी भाषेची सक्ती आहेच, पण पाचवीपासून पुढची भाषा निवडण्याचा अधिकार पालकांना असावा, यावर त्यांनी भर दिला. सध्या महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाला तीव्र विरोध होत असताना, अजित पवारांची ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.
Ajit Pawar Opposes Hindi Language Imposition
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली होती, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. मात्र, तावरे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने निवडणूक घ्यावी लागली, असे पवारांनी ( Ajit Pawar ) स्पष्ट केले.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत आपण टोकाची भूमिका घेतली नव्हती, असे अजित पवारांनी स्पष्ट केले. “मला संचालक किंवा अध्यक्ष व्हायचे नव्हते. मात्र, अध्यक्षपदासाठी सहा ते सात जण इच्छुक असल्याने अध्यक्षपदासाठी माझे नाव जाहीर करावे लागले,” असे सांगत त्यांनी ( Ajit Pawar ) या निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीसांचा खोटेपणा उघड! ठाकरेंनी हिंदी सक्ती स्वीकारलीच नव्हती, अनिल परबांनी दिले पुरावे!
- राणेंनी मारामाऱ्या केल्या, मर्डरही झालं आणि एवढ्या उंचीवर पोहोचले; भरत गोगावलेंचं खळबळजनक वक्तव्य
- अमरावतीत पोलीस अधिकाऱ्याची हत्या; भरदिवसा गाडीने उडवून धारदार शस्त्राने वार, हल्लेखोर फरार