Prakash Ambedkar | 2 गरोदर महिला अन् पोलिसांची क्रूर वागणूक; आळंदीमध्ये घडलेल्या प्रकरणावर प्रकाश आंबेडकर संतापले

Prakash Ambedkar | आळंदी: काल (11 जुन) संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा सुरू असताना काही वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. त्याचबरोबर यादरम्यान पारधी समाजातील तब्बल 150 वारकऱ्यांना वारी आहे, म्हणून आळंदी पोलीस स्थानकात डांबून ठेवण्यात आलं होतं. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि कायदेतज्ञ असीम सरोदे (Asim Sarode) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आळंदीमध्ये घडलेल्या या प्रकरणावर प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आळंदी पोलीस ठाण्यात काल एक अत्यंत चिड आणणारा प्रकार घडला आहे. पांडुरंगाचे दर्शन घ्यायला आलेल्या पारधी समूहाला शिंदे-फडणवीस सरकारने पोलीस स्थानकात डांबून ठेवले होते. यामध्ये दोन गरोदर महिला देखील होत्या.”

Prakash Ambedkar’s tweet on Alandi case

काल आळंदी येथील पोलीस स्टेशनमध्ये अत्यंत चीड आणणारा प्रकार घडला.

विशिष्ट जाती समुहांचे गुन्हेगारीकरण करण्याची इंग्रजांची निती इथला सत्ताधारी उच्चवर्णीय वर्ग कधीपर्यंत रेटणार आहे?

पांडुरंगाचे दर्शन घ्यायला आलेल्या पारधी समूहाला शिंदे – फडणवीस सरकारने पोलिस स्टेशनचे दर्शन घडवले व तुरुंगात डांबून ठेवले.

यात २ महिला गरोदर होत्या. त्यातील एका महिलेला त्रास जाणवत असतांना सुद्धा पोलिस क्रूरपणे वागले. रात्री उशीरा वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आळंदी पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना तिथून सोडवले. तेव्हा त्या महिला धायमोकलून रडत होत्या ! याला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर सरकारने तातडीने करावी. अशी मागणी आम्ही करत आहोत.

याच पार्श्वभूमीवर कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. असीम सरोदे यांनी याबाबत फेसबुक पोस्ट केली आहे.

Asim Sarode’s Facebook post on the incident in Alandi

पारधी समाजातील तब्बल 127 ते 150 जणांना वारी आहे म्हणून आळंदी पोलीस स्टेशनमध्ये सकाळपासून डांबून ठेवण्यात आलेले आहे.

आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी अनेक पारधी समाजातील स्त्रीया, मुले व पुरुषांना कोणत्या कायद्यानुसार ताब्यात घेतले आहे?

छोटयाशा जागेत इतक्या जणांना डांबून ठेवल्याने अनेकांचा जीव गुदरमतोय,त्यांना खायला देण्यात आलेले नाही की त्यांना प्यायला पाणी नाही. आळंदी पोलीस स्टेशन झोन 1 च्या अखत्यारीत आहे तेथील ACP असतील त्यांना माझी विनंती की इन्स्पेक्टर सुनील गोडसे यांना कायदा हातात घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत का हे सांगावे.

कोणत्या शंकेवरून इन्स्पेक्टर गोडसे पारधी समजतील लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात अटक करून ठेवले? त्यांच्यावर गुन्हा नोंदवला का? अश्याप्रकारे मानवीहक्क उल्लंघन करण्याचा गोडसेंना अधिकार दिला कुणी?

पारधी समाजातील बांधवांना केवळ वारीच्या पार्श्वभूमीवर डांबून ठेवणे अन्यायकारक आहे. समाजातील सजग नागरिक, पत्रकारांनी मदत करावी. इन्स्पेक्टर सुनील गोडसे यांना विनंती की त्यांनी डांबून ठेवलेल्या पारधी समाज बांधवाना त्वरित सोडावे.

महत्वाच्या बातम्या