🕒 1 min read
Ambadas Danve | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील राजकीय वर्तुळात दररोज काही ना काही नवीन घडामोडी घडत असतात. शिंदे गटाचे नेते संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी ठाकरे गटावर टीका केली होती. उद्धव ठाकरे दिल्लीत सोनिया गांधींना भेटायला जातात. तिकडे त्यांचा बाप आहे का?, असा प्रश्न संदिपान भुमरे यांनी उपस्थित केला होता.
Sandipan Bhumre criticized Uddhav Thackeray group
संदिपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे गटावर टीकास्त्र चालवलं होतं. मात्र, त्यांच्या या प्रतिक्रियांवर ठाकरे गटाकडून (Ambadas Danve) प्रतिक्रिया आलेली नाही. शिंदे गटापुढे उद्धव ठाकरेंची शिवसेना शांत झाली आहे का? त्याचबरोबर संदिपान भुमरे यांच्या समोर छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेना मावळ झाली आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
Ambadas Danve is in touch with the Shinde group
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील वाद वाढत चालला आहे. दोन्ही गट या प्रकरणाच्या निकालाची वाट बघत आहेत. अशात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी दिली होती. त्यांनतर अंबादास दानवे शिंदे गटात प्रवेश करणार का? या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.
Who is Uddhav Thackeray father – mother? – Sandipan Bhumre
दरम्यान, संदिपान भुमरे यांनी उद्धव ठाकरेंवर शाब्दिक हल्लाबोल केला होता. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, “उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) का गेले होते सोनिया गांधींना (Sonia Gandhi) भेटायला? त्यांचा बाप कोण आहे? त्यांची आई कोण आहे? ते का जातात मग त्यांना भेटायला? ते शरद पवारांना भेटायला जातात. मग शरद पवार (Sharad Pawar) त्यांचे बाप आहे का?”
महत्वाच्या बातम्या
- Rohit Sharma | आम्हाला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही; लाजिरवाण्या पराभवाचे रोहितने BCCI वर फोडले खापर
- Sharad Pawar | शरद पवारांना धमकी देणाऱ्या तरुणाला अटक, नक्की कोण आहे ‘हा’ आयटी इंजिनियर?
- MHT CET Result | आज जाहीर होणार CET निकाल! केव्हा आणि कुठे बघायचा? जाणून घ्या
- Nana Patole | दंगेखोरांना सोडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध – नाना पटोले
- Weather Update | नागरिकांनो सावधान! बिपरजॉय चक्रीवादळामुळे ‘या’ जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










