Rohit Sharma | आम्हाला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही; लाजिरवाण्या पराभवाचे रोहितने BCCI वर फोडले खापर

Rohit Sharma | लंडन: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) चा अंतिम सामना पार पडला. या सामन्यामध्ये भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 209 धावांनी पराभूत केले. चॅम्पियनशिप हरवल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

We had a chance to win the World Test Championship – Rohit Sharma

रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला, “वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याची आमच्याकडे संधी होती. मात्र, या सामन्याआधी टीम इंडियाला तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. आयपीएल संपताच टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. आयपीएलनंतर या सामन्याची तयारी करण्यासाठी आम्हाला फक्त एक आठवड्याचा वेळ मिळाला होता. त्यामुळे भारतीय संघाला या लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.”

पुढे बोलताना तो (Rohit Sharma) म्हणाला, “टीम इंडियाला या सामन्याच्या पहिल्या दिवशी 280 धावा करायच्या होत्या. मात्र, पहिल्या सत्रातच टीम इंडियाचा खेळ संपला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा 209 धावांनी पराभव झाला. भारताला सलग दुसऱ्यांना या चॅम्पियनशिपमध्ये पराभव स्वीकारावा लागत आहे.”

“या सामन्याच्या पहिल्या डावात दरम्यान शार्दुल ठाकूर आणि अजिंक्य रहाणे यांनी चांगली फलंदाजी केली होती. त्यांच्या खेळीनंतर टीम इंडियाने पुनरागमन केले होते. मात्र, दुसऱ्या डावात आम्हाला चांगली खेळी खेळता आली नाही”, असही तो (Rohit Sharma) यावेळी म्हणाला.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.