Sanjay Raut | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचा 25 वा वर्धापन दिन साजरा केला. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. शरद पवार (Sharad Pawar) यांनी कार्यक्रमात मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची निवड करण्यात आली आहे. या दोघांकडे वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना सरचिटणीस पद देण्यात आलं आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीत अजित पवारांना डच्चू देऊन लेकीवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
शरद पवारांच्या या निर्णयावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले आम्ही कुणाचे वकीलपत्र घेतले नाही. असे म्हणत अजित पवारांना राऊतांनी टोला लगावला. पुढे बोलतांना म्हणाले “पक्षाने जर कुणावर न्याय अन्याय केला असेल तर ती व्यक्ती त्या विषयावर प्रतिक्रिया देईल. पक्ष्याच्या अंतर्गत घडामोडींवर बाहेरच्या व्यक्तींनं का बोलावं? योग्य तो निर्णय घेण्यासाठी शरद पवार समर्थ आहे.”
No One Has Been Wronged – Jayant Patil
अजित पवार यांच्यावर अन्याय झाला आहे का? असा प्रश्न जयंत पाटलांना (Jayant Patil) विचारण्यात आला होता. यावर उत्तर देत जयंत पाटील म्हणाले, “अजित पवार यांच्याकडे आधीच मोठी जबाबदारी आहे. ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आहे. सर्वांचे मत विचारूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कुणावरही अन्याय झालेला नाही.”
Ajit Pawar Already Has A Huge Responsibility – Sharad Pawar
अजित पवार यांना पद का दिलं नाही? यावर बोलताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “अजित पवार विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आहे. त्यामुळे त्यांच्या खांद्यावर आधीपासूनच खूप मोठी जबाबदारी आहे. म्हणून त्यांना पक्षात कोणतेही पद देण्यात आलेले नाही. पक्षाच्या या निर्णयावर अजित पवार अजिबात नाराज नाही.”
राष्ट्रवादीत अजित पवारांना डच्चू! तर पवारांनी लेकीला दिली मोठी जबाबदारी
अजित पवार यांच्याकडे कोणतीच जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राष्ट्रवादीत अजित पवार साईड ट्रॅकवर गेले काय? अशा चर्चा रंगल्या आहेत. शरद पवार यांनी अचानक घोषणा केल्यामुळे या घोषणा म्हणजे धक्कातंत्राचा भाग असल्याचं बोललं जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- Maharashtra Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तारावेळी शिंदे गटाच्या ‘त्या’ पाच मंत्र्यांची हकालपट्टी करा; भाजपचा सज्जड दम
- Ajit Pawar | भाजपने आपली चूक मान्य करायला हवी; शरद पवार धमकी प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया
- Sharad Pawar | राष्ट्रीय पक्ष नसताना राष्ट्रवादीचा वर्धापन दिन दिल्लीत साजरा, राजधानीत नक्की NCP चं कोण आहे?
- Sanjay Raut | एकनाथ शिंदे गटानं नाही तर ‘या’ व्यक्तीनं फोडली शिवसेना; संजय राऊतांचा गंभीर आरोप
- Nilesh Rane | निलेश राणेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला डिवचलं! म्हणाले, “माझ्यासाठी स्वतःला अटक…”