Jayant Patil | मुंबई: आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवारांनी (Sharad Pawar) मोठी घोषणा केली आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे शरद पवारांनी कोणतेही पद सोपावलं नाही. याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
No one has been wronged – Jayant Patil
अजित पवार यांच्यावर अन्याय झाला आहे का? असा प्रश्न जयंत पाटलांना (Jayant Patil) विचारण्यात आला होता. यावर उत्तर देत जयंत पाटील म्हणाले, “अजित पवार यांच्याकडे आधीच मोठी जबाबदारी आहे. ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आहे. सर्वांचे मत विचारूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कुणावरही अन्याय झालेला नाही.”
पुढे बोलताना ते (Jayant Patil) म्हणाले, “शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयांमध्ये कोणत्याही प्रकारची घराणेशाही दिसत नाही. त्यामुळे पक्षात गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहे. पक्ष वाढवण्यासाठी शरद पवारांनी हे निर्णय घेतले आहे.”
राष्ट्रवादीत अजित पवारांना डच्चू देऊन लेकीवर मोठी जबाबदारी
दरम्यान, शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळेआणि प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आली आहे. या दोघांकडे वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना सरचिटणीस पद देण्यात आलं आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीत अजित पवारांना डच्चू देऊन लेकीवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | “कुणावर अन्याय झाला असेल तर…”; संजय राऊतांचं अजित पवारांबाबत मोठं वक्तव्य
- Ajit Pawar | राष्ट्रवादीत अजित पवारांना डच्चू! तर पवारांनी लेकीला दिली मोठी जबाबदारी
- Dress Code In Temple | राज्यातील 144 मंदिरात ड्रेस कोड लागू; मंदिर महासंघाने दिली माहिती
- Cabinet Expansion | संदीपान भूमरेंनी उद्धव ठाकरेंचा बाप कोण विचारले; भाजपने भूमरेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टीचा निर्णय घेतला
- Sharad Pawar | शरद पवारांची मोठी घोषणा! सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी