Sanjay Raut | मुंबई: आज राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचा 25 वा वर्धापन दिन साजरा केला. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. तर अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे पक्षाची कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज 25 वर्षानंतर नवीन घडामोडी घडत आहे. पक्षाने घेतलेल्या निर्णयावर आम्ही काहीच प्रतिक्रिया देऊ शकत नाही. शरद पवार त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना पक्षाबाबत सर्व निर्णय घेण्याचा अधिकार आहे. राष्ट्रवादी हा महाविकास आघाडीतील पक्ष असला, तरी त्यांच्या अंतर्गत गोष्टींवर आम्ही बोलू शकत नाही.
Sharad Pawar is capable of taking right decisions
पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “पक्षाने जर कुणावर न्याय अन्याय केला असेल तर ती व्यक्ती त्या विषयावर प्रतिक्रिया देईल. पक्ष्याच्या अंतर्गत घडामोडींवर बाहेरच्या व्यक्तींनं का बोलावं? योग्य तो निर्णय घेण्यासाठी शरद पवार समर्थ आहे.”
Sharad Pawar made a big announcement
दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची निवड करण्यात आली आहे. या दोघांकडे वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना सरचिटणीस पद देण्यात आलं आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीत अजित पवारांना डच्चू देऊन लेकीवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Dress Code In Temple | राज्यातील 144 मंदिरात ड्रेस कोड लागू; मंदिर महासंघाने दिली माहिती
- Cabinet Expansion | संदीपान भूमरेंनी उद्धव ठाकरेंचा बाप कोण विचारले; भाजपने भूमरेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टीचा निर्णय घेतला
- Sharad Pawar | शरद पवारांची मोठी घोषणा! सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
- Delhi Capitals | रिकी पॉंटिंगची सुट्टी! IPL 2024 मध्ये DC चा कोच असणार भारतीय दिग्गज
- Maharashtra Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तारावेळी शिंदे गटाच्या ‘त्या’ पाच मंत्र्यांची हकालपट्टी करा; भाजपचा सज्जड दम