Sharad Pawar | दिल्ली: आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. वर्धापन दिनानिमित्त राजधानी दिल्लीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमादरम्यान शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.
Sunil Tatkare has been given the post of General Secretary
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनी शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची निवड करण्यात आली आहे. या दोघांकडे वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना सरचिटणीस पद देण्यात आलं आहे.
सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणा या राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे राजस्थान, गुजरात, झारखंड आणि मध्य प्रदेश राज्याची जबाबदारी दिली आहे.
Supriya Sule and Praful Patel working president of NCP – Sharad Pawar
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) , खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे सगळे दिल्लीत उपस्थित आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | भाजपने आपली चूक मान्य करायला हवी; शरद पवार धमकी प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया
- Sharad Pawar | राष्ट्रीय पक्ष नसताना राष्ट्रवादीचा वर्धापन दिन दिल्लीत साजरा, राजधानीत नक्की NCP चं कोण आहे?
- Sanjay Raut | एकनाथ शिंदे गटानं नाही तर ‘या’ व्यक्तीनं फोडली शिवसेना; संजय राऊतांचा गंभीर आरोप
- Nilesh Rane | निलेश राणेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला डिवचलं! म्हणाले, “माझ्यासाठी स्वतःला अटक…”
- Gold Rate | सोन्या चांदीच्या किमतीत बदल! जाणून घ्या प्रति तोळा भाव