Nilesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: निलेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यामधील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. निलेश राणे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला होता. शरद पवार म्हणजे औरंगजेबाचा पुनर्जन्म असं वादग्रस्त वक्तव्य निलेश राणेंनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आक्रमक होऊन आंदोलन केलं होतं.
शरद पवार यांच्यावर खोचक टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या विरुद्ध आंदोलन केलं होत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आंदोलनानंतर अटक करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डिवचलं आहे.
Nilesh Rane criticize NCP through tweet
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 14 कार्यकर्ते 14 मिनिटांसाठी माझ्या विरोधात काल आझाद मैदान जवळ आंदोलन करायला उतरले आणि स्वतःला अटक करून घेतलं. राष्ट्रवादी पक्षाच्या यशस्वी कामगिरीबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 14 कार्यकर्ते 14 मिनिटांसाठी माझ्या विरोधात काल आझाद मैदान जवळ आंदोलन करायला उतरले आणि स्वतःला अटक करून घेतलं.
राष्ट्रवादी पक्षाच्या यशस्वी कामगिरीबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 10, 2023
दरम्यान, दरम्यान, निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करत शरद पवार यांच्यावर टीका केली. ट्विट करत निलेश राणे म्हणाले, “निवडणुका जवळ आल्या की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होऊ लागतात. कधी कधी वाटतं औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार.”
महत्वाच्या बातम्या
- Gold Rate | सोन्या चांदीच्या किमतीत बदल! जाणून घ्या प्रति तोळा भाव
- Love Jihad | लव्ह जिहाद प्रकरण चर्चेत असताना मुस्लिम मुलीने बांधली हिंदू मुलासोबत लग्नगाठ
- Weather Update | कुठे तीव्र ऊन तर कुठे मुसळधार पाऊस, पाहा हवामान अंदाज
- Religion Conversion | ‘आम्ही आमच्या मर्जीने धर्म बदलला’ हिंदू महिला शिक्षिकांनी केला मुस्लिम धर्मात प्रवेश
- Amruta Fadnavis | देवेंद्र फडणवीस आणि माझा घटस्फोट होऊ शकतो? अमृता फडणवीस असं का म्हणाल्या?