Share

Amruta Fadnavis | देवेंद्र फडणवीस आणि माझा घटस्फोट होऊ शकतो? अमृता फडणवीस असं का म्हणाल्या?

Amruta Fadnavis | मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी गंभीर वक्तव्य केलं होतं. देवेंद्र फडणवीस आणि माझा घटस्फोट होऊ शकतो, असं त्या म्हणाल्या होत्या. त्या असं का म्हणाल्या होत्या? याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी खंडणी प्रकरणातील आरोपी जयसिंगसोबत केलेली चॅट समोर आली आहे. … Read more

Published On: 

Amruta Fadnavis | मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी गंभीर वक्तव्य केलं होतं. देवेंद्र फडणवीस आणि माझा घटस्फोट होऊ शकतो, असं त्या म्हणाल्या होत्या. त्या असं का म्हणाल्या होत्या? याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी खंडणी प्रकरणातील आरोपी जयसिंगसोबत केलेली चॅट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीला समोर आणण्यासाठी पोलिसांनी अमृता फडणवीस यांना अनिल जयसिंगसोबत बोलायला सांगितलं होतं. तिचं चॅट आता समोर आली आहे.

My relationship with Devendra has not been good for the past few days

आरोपीकडून माहिती गोळा करण्यासाठी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी त्याला त्यांच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नात्याबद्दल सांगितलं होतं. आरोपीला विश्वासात घेण्यासाठी त्या म्हणाल्या होत्या, “माझे आणि देवेंद्रचे संबंध गेल्या काही दिवसांपासून चांगले नाही. लवकरच आमचा घटस्फोट होऊ शकतो.” आरोपीच्या संपर्कात राहून माहिती गोळा करण्यासाठी पोलिसांनी अमृता फडणवीस यांना त्याच्यासोबत बोलायला सांगितलं होतं.

Aniksha met Amruta Fadnavis in November 2021

अनिल जयसिंगची मुलगी अनिक्षा ही नोव्हेंबर 2021 मध्ये पहिल्यांदा अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना भेटली होती. त्यानंतर त्या दोघींमध्ये मैत्री झाली. अनिल जयसिंग आधीपासूनच अनेक गुन्ह्यांमध्ये अडकलेले होते. त्यामधून सुटका मिळवण्यासाठी अनिक्षानं ठरवून अमृता यांच्यासोबत  मैत्री केल्याची माहिती मिळाली आहे.

अमृतासोबत (Amruta Fadnavis) मैत्री झाल्यानंतर अनिल जयसिंग आणि अनिक्षाने मिळून अमृता फडणवीस यांच्याकडे एक कोटींची मागणी केली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात अमृता फडणवीस यांनी त्यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती. त्या दोघांना पकडण्यासाठी अमृता यांनी त्यांच्या संपर्कात राहावं, असं पोलिसांनी त्यांना सांगितलं होतं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install