Sharad Pawar | शरद पवारांना भाजपकडून जीवे-मारण्याची धमकी? धमकी देणाऱ्याचे BJP नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल

Sharad Pawar | अमरावती: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे-मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती मिळाली होती. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. शरद पवार यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांनी शोध घेतला आहे. हा व्यक्ती भाजप कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे.

Saurabh Pimpalkar has threatened Sharad Pawar

शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सौरभ पिंपळकर (Saurabh Pimpalkar) या व्यक्तीनं शरद पवारांना धमकी दिली असल्याची माहिती मिळाली आहे. सौरभ पिंपळकर हा अमरावती भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी पवारांविरोधात हा डाव आखला होता का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

Saurabh’s photos with BJP leader went viral on social media

सौरभ पिंपळकर याचे भाजपच्या बड्या नेत्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule ) आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यासोबतचे त्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Supriya Sule has filed a complaint to the police

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना धमकी मिळाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पवार साहेबांच्या नावाने माझ्या व्हाट्सअपवर मेसेज आला आहे. एका वेबसाईटच्या माध्यमातून शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे मी न्याय मागायसाठी पोलिसांकडे आले आहे.”

महत्वाच्या बातम्या