Keshav Upadhye | मुंबई: राज्यामध्ये सध्या औरंगजेब आणि लव्ह जिहादच मुद्दा चांगलाच तापला आहे. या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र चालवलं आहे. महाविकास आघाडी हाच एक प्रकारचा लव्ह जिहाद असल्याचं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
Mahavikas Aghadi is a type of love jihad
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्विट करत महाविकास आघाडीवर खोचक टीका केली आहे. ट्विट करत केशव उपाध्ये म्हणाले, “महाविकास आघाडी हा एक प्रकारचा लव्ह जिहाद आहे. उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) शिल्लक सेना स्वतःहून लव्ह जिहादची बळी पडलेली आहे. हिंदुत्ववादी विचार सोडून शिल्लक सेनाची राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जी फरपट होत आहे तोही एक प्रकारचा लव्ह जिहादच आहे. त्यामुळे आता शिल्लक सेनेला आसपासचं भगव्या ऐवजी हिरवं दिसायला लागलं आहे.”
महाविकास आघाडी हाच एक प्रकारचा लव जिहाद आहे…
उद्धव ठाकरेंची शिल्लक सेना स्वताहून पडलेली ‘लव्ह जिहाद’ची बळी आहे…
हिंदुत्ववादी विचार सोडून शिल्लक सेनेचे कॅांग्रेस-राष्ट्रवादीसोबत जी फरफट होतेय, तोही एक प्रकारचा लव जिहादच आहे…
त्यामुळे शिल्लक सेनेला आसपासचं भगव्याऐवजी हिरवं… pic.twitter.com/PqDwQxBA9h
— Keshav Upadhye (@keshavupadhye) June 9, 2023
“शिल्लक सेना स्वतःच किती अध:पतन करून घेणार आहे. अहो, राऊत आमचं सोडा तुमच्यासोबत असणाऱ्या अबू आझमीला औरंग्या प्रिय आहे. आता तो तुम्हालाही वाटायला लागलाय का? कारण त्यावर तुम्ही तोंड उघडलेले नाही. साप साप म्हणून भुई थोपटण्याचा धंदा बंद करा राऊत (Sanjay Raut)”, असेही त्यांनी (Keshav Upadhye) या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करत राष्ट्रवादीला खुलं चॅलेंज दिलं आहे. ट्विट करत निलेश राणे म्हणाले, “माझ्या विरोधात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आंदोलन करायचं असेल तर मी त्यांना चॅलेंज करतो की त्यांनी ते मुंब्रा शहरामध्ये म्हणजे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या मतदारसंघात करून दाखवावं.”
महत्वाच्या बातम्या
- Ashadhi Wari | “…नाहीतर वारी थांबवली जाईल”; वारकरी साहित्य परिषदेचा राज्य शासनाला थेट इशारा
- Nilesh Rane | हिम्मत असेल तर राष्ट्रवादीनं जितेंद्र आव्हाडांच्या मतदारसंघात आंदोलन करून दाखवावं; राष्ट्रवादीला निलेश राणेंचं खुलं चॅलेंज
- Gautami Patil | “गौतमीताई थोडी लावणीची तयारी करून या, नाहीतर…”; छोट्या पुढारीचा गौतमी पाटीलला इशारा
- Weather Update | केरळमध्ये मान्सून दाखल, तर महाराष्ट्रामध्ये कधी येणार पाऊस?
- RBI Governor | 500 रुपयांच्या नोटांवर बंदी? पुन्हा चलनात येणार 1000 रुपयाची नोट? RBI गव्हर्नर म्हणतात…