Gautami Patil | पुणे: सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील सध्या चर्चेत आहे. गौतमी आपल्या नृत्याने सर्वांना भुरळ घालते. त्याचबरोबर कोणत्याही ठिकाणी तिच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी असते. मात्र, ती तिच्या नृत्यामुळे कायम वादात सापडते. याच पार्श्वभूमीवर छोटा पुढारी घनश्याम दरोडे (Chhota Pudhari Ghanshyam Darode) याने गौतमीला इशारा दिला आहे. गौतमीताई लावणीची थोडी तयारी करून या, असं वक्तव्य छोटा पुढारी घनश्याम दरोडे याने केलं आहे.
छोटा पुढारी घनश्याम दरोडेनं त्याच्या मुसंडी चित्रपटानिमित्त पुण्यात रॅलीचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलत असताना त्याने गौतमी पाटीलला (Gautami Patil) थेट इशारा दिला आहे. यावेळी बोलत असताना छोटा पुढारी म्हणाला, “मी गौतमी ताईंना प्रत्यक्ष भेटणार आहे. आम्ही मुसंडी मारल्यानंतर तुम्ही लावण्याची तयारी करून या. महाराष्ट्राची लावणी कशी असते, याची तुम्ही तयारी करून या. नाहीतर आम्हाला तुम्हाला लावणी काय असते? हे दाखवून द्यावं लागेल.
दरम्यान, महाराष्ट्राचा बिहार करू नका असं छोटा पुढारी याने गौतमीला (Gautami Patil) म्हटलं होतं. मी महाराष्ट्राचा काय बिहार केला? असा प्रश्न गौतमीने उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देत छोटा पुढारी म्हणाला, “गौतमी ताईला महाराष्ट्राचा बिहार करायचा असेल तर तुम्ही बिहारमध्ये जाऊन नाचा. महाराष्ट्रामध्ये हे सर्व खपवून घेतले जाणार नाही.”
छोटा पुढारी घनश्याम दरोडे सातत्याने गौतमी पाटीलवर (Gautami Patil) शाब्दिक हल्लाबोल करत असतो. गौतमी पण नेहमी त्याला सडेतोड उत्तर देत असते. आता त्याच्या या इशाऱ्यावर गौतमी काय प्रतिक्रिया देईल? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | केरळमध्ये मान्सून दाखल, तर महाराष्ट्रामध्ये कधी येणार पाऊस?
- RBI Governor | 500 रुपयांच्या नोटांवर बंदी? पुन्हा चलनात येणार 1000 रुपयाची नोट? RBI गव्हर्नर म्हणतात…
- IND vs AUS | भारत जोमात ऑस्ट्रेलिया कोमात! सिराजच्या घातक गोलंदाजीपुढ ऑस्ट्रेलियाने टेकले गुडघे
- AURIC City Bidkin | ऑरिक होणार स्वदेशी ड्रोन आणि संरक्षण क्षेत्रातील उत्पादनाचे केंद्र
- Gautami Patil | हुबेहूब आईची प्रतिकृती! वडिलांनंतर गौतमीच्या आईचा फोटो व्हायरल