Gautami Patil | CM शिंदेंच्या ठाण्यात गौतमी पाटील गाजवणार दिवाळी पहाट

Gautami Patil | ठाणे: ठाण्यातील वातावरण अत्यंत तापलं आहे. कारण ठाण्यातील मुंब्रा येथील शंकर मंदिर परिसरात असलेली 22 वर्षे जुनी शाखा पाडण्यात आली आहे.

या घटनेनंतर राज्याचं राजकीय वातावरण अत्यंत तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुंब्रामध्ये दाखल झाले आहे.

अशात ठाण्यातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ठाण्यातील राजकीय वातावरण तापलेलं असताना प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिचा ठाण्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Gautami Patil’s program has been organized on the occasion of Diwali

दिवाळीनिमित्त अनेक ठिकाणी दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, शास्त्रीय संगीत, सुगम संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील राजकीय वातावरण तापलेलं असताना दिवाळी पहाटनिमित्त गौतमी पाटील (Gautami Patil) च्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

याबाबत गौतमी पाटील (Gautami Patil) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केली आहे. ठाण्यातील राजकीय वातावरण तापलेलं असताना गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

बहुतांश वेळा तिच्या कार्यक्रमांमध्ये राडा झालेला दिसला आहे. अशात ठाण्यामध्ये तिचा कार्यक्रम शांततेत होणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

दरम्यान, 12 नोव्हेंबर रोजी गौतमी पाटीलचा (Gautami Patil) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

राज्यातील विविध भागांमध्ये गौतमी पाटीलचे (Gautami Patil) कार्यक्रम झालेले आहेत. तिच्या बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये होणारा गोंधळ आणि राडांमुळे ती अनेकदा चर्चेत देखील आली आहे.

त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात होणार असलेल्या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. गौतमी पाटीलच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार का? याबाबत आता राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.