Ravi Rana | शरद पवार 99% कन्व्हेन्स, दिवाळीपूर्वी होऊ शकतो मोठा धमाका; रवी राणा यांचं मोठं वक्तव्य

Ravi Rana | अमरावती: राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर काल शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची भेट झाली.

त्यानंतर अजित पवार लगेचच दिल्लीला रवाना झाले. दिल्लीला त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या सर्व घडामोडींवर आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार लवकरच नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शवतील, असं रवी राणा (Ravi Rana) यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Sharad Pawar got 99% conveyance – Ravi Rana

रवी राणा (Ravi Rana) म्हणाले, “शरद पवार हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहे. काल शरद पवार आणि अजित पवार यांची ज्या पद्धतीने भेट झाली त्यानंतर मला (Ravi Rana) असं वाटत आहे की शरद पवार 99% कन्व्हेन्स झाले आहेत.

यानंतर दिवाळी आधी मोठा धमाका होऊ शकतो, दिवाळीदरम्यान मोठा बॉम्ब फुटू शकतो. शरद पवार नरेंद्र मोदींना पाठिंबा दर्शवू शकतात.

ते भारतीय जनता पक्षासोबत सामील होऊ शकतात. शरद पवार जर सत्तेत सामील झाले तर सरकारची ताकद वाढेल. त्याचबरोबर यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील संघर्ष संपेल.”

दरम्यान, काल दुपारी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र आले होते. पुण्यामध्ये त्यांची ही भेट झाली.

शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नीची प्रकृती बरी नसल्याने त्यांची चौकशी करण्यासाठी शरद पवार सुप्रिया सुळे अजित पवार पुण्यात दाखल झाले.

या भेटीनंतर अजित पवार त्वरित दिल्लीला रवाना झाले. त्यानंतर सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्यासह अजित पवारांनी अमित शाह यांची भेट घेतली. या सर्व घडामोडीनंतर शरद पवार भारतीय जनता पक्षामध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.