Share

Manoj Jarange | मराठ्यांबद्दल विजय वडेट्टीवारांची विचारधारा विष पेरणारी; मनोज जरांगेंचं वडेट्टीवारांना प्रत्युत्तर

Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आरक्षणासाठी लढत आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली होती. मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा समाजाच्या मुलांच्या भल्यासाठी नाही तर राजकीय फायद्यासाठी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करत आहे, असं विजय वडेट्टीवार … Read more

Published On: 

Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आरक्षणासाठी लढत आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली होती.

मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा समाजाच्या मुलांच्या भल्यासाठी नाही तर राजकीय फायद्यासाठी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करत आहे, असं विजय वडेट्टीवार म्हटलं होतं.

विजय वडेट्टीवार यांच्या या टीकेला मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. विजय वडेट्टीवार भाजपात जाऊ इच्छितात का? असा सवाल मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपस्थित केला आहे.

Manoj Jarange commented on Vijay Wadettiwar

मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, “विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्ष नेते आहेत. जनतेला न्याय देण्याचं काम विरोधी पक्षनेता करत असतो.

त्यामुळे त्यांनी जनतेच्या वतीने बोलायला हवं. परंतु, ते या गोष्टीचं राजकारण करत आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ, असं ते अंतरवाली सराटी येथे म्हणाले होते.

त्यानंतर त्यांनी कसा रंग बदलला आहे, सर्वांनी पाहिलं आहे. राजकारणासाठी ते हे सगळं करत आहे. त्यामुळे त्यांनी मराठ्यांना सल्ले देणं बंद करायला हवं.”

पुढे बोलताना ते (Manoj Jarange) म्हणाले, “विजय वडेट्टीवार सरकारच्या बाजूने बोलत आहे. ते भाजपमध्ये जाऊ इच्छित आहे का? तुमच्या राजकारणात आम्हाला कशाला ओढता?

त्याचबरोबर तुम्ही मराठा तरुणांना सल्ले देऊ नये. मराठा पोरांना काय करायचं याची समज आहे. तुम्हाला मराठा समाजाविषयी किती राग आहे, हे आम्हाला चांगलंच माहित आहे.

मराठ्यांच्या पोरांचे मुडदे पडले पाहिजे, असं त्यांना वाटत आहे. राजकीय स्वार्थासाठी तुम्ही मराठा नेत्यांचा कसा वापर केला? हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे तुम्ही कुणाला सल्ले देऊ नका. कुणाच्या मागे उभं राहायचं? हे मराठा समाजातील तरुणांना माहित आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही