Sharad Pawar | राज्याच्या राजकारणात येणार मोठा भूकंप? शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधान

Sharad Pawar | पुणे: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट अनेकदा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे.

अशात राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज अजित पवार, शरद पवार (Sharad Pawar) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची पुण्यामध्ये भेट झाली आहे.

त्यांच्या या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलेलं असून त्यांच्या या भेटीबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

Ajit Pawar, Sharad Pawar and Supriya Sule have come together in Pune

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर अजित पवार, शरद पवार (Sharad Pawar) आणि सुप्रिया सुळे पुण्यामध्ये एकत्र आले आहेत. प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी यांची ही भेट झाली आहे.

प्रतापराव पवार हे शरद पवारांचे (Sharad Pawar) बंधू आहेत. त्यांच्या निवासस्थानी राज्याच्या राजकारणातील हे तिन्ही नेते एकत्र आले.

प्रतापराव पवार यांच्या पत्नीची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी सुप्रिया सुळे, शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार आणि त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले.

दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने बारामती येथील गोविंद बागेत पवार कुटुंब एकत्र येतं. मात्र, यंदा अजित पवार पाडव्याला जाणार नसल्याच्या चर्चा सुरू आहे. अजित पवारांची प्रकृती खालावलेली असल्यामुळे ते पाडव्याला जाणार नसल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी अजित पवारांना पाठिंबा दर्शवला आहे. अशात आज दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची त्यांच्या पुण्यातील मोतीबागेतील निवासस्थानी भेट घेतली आहे. राष्ट्रवादीचे दोन गट पडण्यापूर्वी दिलीप वळसे पाटील शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जात होते.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.