Dilip Walse Patil | शरद पवारांची भेट का घेतली? दिलीप वळसे पाटील म्हणतात…

Dilip Walse Patil | पुणे: अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही आमदार काही महिन्यांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते.

यामध्ये दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचा देखील समावेश होता. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आज पहिल्यांदाच मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे.

या भेटीनंतर दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) शरद पवार गटात जाणार का? अशा चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या.

या चर्चांना दिलीप वळसे पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे. कारण त्यांनी शरद पवारांची भेट का घेतली? याचं कारण सांगितलं आहे.

Why did you meet Sharad Pawar?

प्रसार माध्यमांशी बोलत असताना दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले, “गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी आमची ही भेट ठरलेली होती.

आमच्या या भेटीनंतर संभ्रम निर्माण होण्याचं कारण नाही. कारण आमच्या या बैठकीत रयत शिक्षण संस्थेतील पदाधिकारी देखील उपस्थित होते.

त्या संस्थेतील काही पदावर मी काम करत आहे. राज्य सहकारी संघ, रयत शिक्षण संस्था, वसंत दादा शुगर इत्यादींवर आम्ही काम करत आहोत.

हे सर्व कामं करत असताना आम्ही शरद पवार यांचं मार्गदर्शन घेतो. त्या संदर्भात आजची ही बैठक झाली आहे. संस्थेचा कारभार पुढे नेण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली आहे.”

दरम्यान, दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी शरद पवारांची त्यांच्या पुण्यातील मोतीबागेतील निवासस्थानी भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडण्यापूर्वी दिलीप वळसे पाटील शरद पवार यांचे निकटवर्ती मानले जात होते.

अशात त्यांच्या या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. पवारांसोबत झालेल्या भेटीचं कारण सांगून दिलीप वळसे पाटील यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.